Delhi Chief Minister : परवेश वर्मा नाही, 'या' महिला नेत्याला मिळणार दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची संधी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या बंदना कुमारी यांचा सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला होता. 2020 च्या निवडणुकीत त्या याच मतदारसंघात कमी फरकाने हरल्या होत्या.

Mumbai Tak

मुंबई तक

20 Feb 2025 (अपडेटेड: 20 Feb 2025, 09:20 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

परवेश वर्मा यांना डच्चू, रेखा गुप्ता यांना संधी

point

महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत वापरला नाही

point

पहिल्यांदा आमदार झालेल्या रेखा गुप्ता मुख्यमंत्री होणार

दिल्लीत भाजप मुख्यमंत्रि‍पदासाठी कुणाला संधी देणार यावर सर्वांचं लक्ष होतं. भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कुणाची निवड करेल हे सांगणं कठीण होतं. अचानक एक नाव समोर आलं आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा यांनी रेखा गुप्ता यांना दिल्लीचे नवे मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव मांडला आणि भाजपच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> "अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप, आधी शासनाचा जीआर..."', धनंजय मुंडेंनी घेतला अंजली दमानीयांचा समाचार

दिल्ली सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या 6 जणांच्या यादीतलं पहिलं नाव परवेश वर्मा यांचं होतं. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा हे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतील भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांपैकी एक होते. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री उमेदवार अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून ते विधानसभेत पोहोचले. अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचल्यानंतर, परवेश वर्मा यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र, रेखा गुप्ता मुख्यमंत्री होणार आहेत.

कोण आहेत रेखा गुप्ता?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या बंदना कुमारी यांचा सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला होता. 2020 च्या निवडणुकीत त्या याच मतदारसंघात कमी फरकाने हरल्या होत्या. रेखा गुप्ता दिल्ली महानगरपालिकेच्या नगरसेवक आणि दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा देखील राहिल्या आहेत. दिल्ली निवडणुकीतील विजयानंतर, मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा होत होती, त्यात रेखा गुप्ता यांचंही नाव होतं. 

पत्ता कटला, ते परवेश वर्मा कोण?

हे ही वाचा >> Mumbai Tak Chavadi: 'पैशांशिवाय काँग्रेस पक्ष उभा राहू शकतो का?', हर्षवर्धन सपकाळ थेट म्हणाले, "राजकारणात..."

47 वर्षीय परवेश वर्मा हे जाट समुदायातून येणारे नेते आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव करून परवेश वर्मा दिल्ली विधानसभेत पोहोचले आहेत. 2013 च्या दिल्ली निवडणुकीत परवेश वर्मा पहिल्यांदा मेहरौली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. परवेश वर्मा यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे नरिंदर सिंग सेजवाल यांचा 4564 मतांनी पराभव केला होता. 

    follow whatsapp