मुंबई: राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी 10 वीची (SSC)परीक्षा रद्द झाली असून आता दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण (Marks) दिले जाणार आहे. त्याचआधारे दहावीच्या (10th Board Exam) परीक्षेचा निकाल लावण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी दिली की, दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जून २०२१ पर्यंत जाहीर करण्यात येईल. (SSC exam Result 2021)
ADVERTISEMENT
सर्वात आधी जाणून घेऊयात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या:
‘कोरोनामुळे आपल्यासमोर बरीच आव्हानं आली आहेत आपल्यासमोर वर्षभरात. शिक्षण क्षेत्रात तर खूपच जास्त आव्हानं आली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन ऑफलाइन सर्व वेगवेगळे उपक्रम वर्षभरात केले आहेत. मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत गेले आणि असामान्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे १०ची विद्यार्थी, पालक आणि आमचे कर्मचारी यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. म्हणूनच राज्य मंडळातर्फे आयोजित केलेली १०वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता.’
‘त्यानुसार राज्यशासनाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावीसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यासंदर्भातील परवानगी दिलेली आहे. मंडळामार्फत जून 2021 अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल आणि सर्व शाळांनी तंतोतंत त्याचे पालन करावे.’
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रावर अभूतपूर्व असं संकट कोसळलं आहे. आजवर कधीही दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या नव्हत्या. मात्र, आता पहिल्यांदाच दहावी बोर्डाची परीक्षा रद्द होऊन फक्त अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर केला जाणार असल्याने काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. जाणून घेऊयात याविषयी अगदी सविस्तरपणे:
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा – राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रश्न: दहावीची (SSC) परीक्षा होणार का?
उत्तर: नाही.. यंदा दहावीच्या राज्य मंडळाची परीक्षा (SSC) होणार नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थी, पालक आणि परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक यांचे आरोग्य ही प्राथमिकता असल्याने राज्य मंत्रिमंडळाने १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे.
प्रश्न: दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना गुण कसे दिले जाणार?
उत्तर: दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधार जाहीर केला जाणार असला तरीही त्यासाठी शिक्षण खात्याने आता एक विशिष्ट प्रारुप ठरवून दिलं आहे. जाणून घ्या कशापद्धतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे.
2020-21 साठी इ. 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषाद्वारे निश्चित करण्यात येईल.
1. विद्यार्थ्यांचे इ. १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
2. विद्यार्थ्यांचे इ. १० चे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
Covid 19 चा प्रादुर्भाव वाढल्याने SSC च्या परीक्षा रद्द-वर्षा गायकवाड
प्रश्न: इयत्ता अकरावीचे प्रवेश रखडणार का?
उत्तर: यंदा अकरावीचे प्रवेश रखडण्याची अधिक शक्यता आहे. कारण शिक्षण खात्याने असं स्पष्ट केलं आहे की, 11वीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 10 वीच्या परीक्षेवरच आधारित असेल. यावेळी 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.
इ. 11 वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजेच सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरच रिक्त राहिलेल्या जागी इतर विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील (ज्यांनी सामाईक परीक्षा न दिलेले) त्या विद्यार्थ्यांना 10वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार, गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.
दरम्यान, ही सगळी प्रक्रिया लक्षात यंदा 11 वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बरीच वाट पाहावी लागू शकते.
अशा पद्धतीने घेता येतील दहावीच्या परीक्षा ! याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाडांना निवेदन
निकालावर समाधानी नसणाऱ्या विदयार्थ्याना मिळणार दोन संधी
यंदा दहावीचा निकाल कोरोना संसर्गामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात येणार आहे. या निकषानुसार मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्यांना मान्य नसतील असे विद्यार्थी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देऊ शकतात. त्यांच्यासाठी दोन संधी उपलब्ध करुन देण्यात येतील. अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT