अल्माटी (कझाकिस्तान): कझाकिस्तानमध्ये तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती निवासासह अनेक सरकारी कार्यालये आणि इतर राजकीय नेत्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत. आंदोलकांनी पळून जाण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार देखील केल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
कझाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आठ पोलीस अधिकारी आणि नॅशनल गार्डचे काही सदस्य ठार झाले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहे. यावेळी नागरिकांच्या जीवितहानीची कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
आणीबाणीचाही काही परिणाम झाला नाही
राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट टोकायव यांनी आंदोलकांना अनेक वेळा शांततेचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम न झाल्याने अनेक कठोर पावलेही उचलण्यात आली होती. त्यांनी दोन आठवड्यांची आणीबाणी देखील जाहीर केली होती.
यानंतर, नूर-सुलतानची राजधानी आणि अल्माटी या दोन्ही शहरांमध्ये आणीबाणी वाढविण्यात आली. तसेच इथे नाइट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला. यानंतरही आंदोलकांवर नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळे स्थानिक सरकारला राजीनामा द्यावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानमध्ये इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना कोणत्याही बाहेर नेमकं काय घडतयं याबाबत काहीही माहिती मिळत नसल्याचं समजतं आहे. नेटब्लॉक्सने सांगितले आहे की, देशात व्यापक इंटरनेट ब्लॅकआउट सुरु असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
दुसरीकडे रशियन वृत्तसंस्था टासने सांगितले की, गुरुवारी पहाटे अल्माटीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
दुप्पट झाल्या किंमती
वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलियम गॅसच्या किमती जवळपास दुप्पट केल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. टोकायव यांनी दावा केला की निदर्शनांचे नेतृत्व ‘दहशतवादी गट’ करत आहेत. ज्यांना इतर देशांकडून मदत मिळते आहे.
ते असंही म्हणाले की, अल्माटीच्या विमानतळावरील हल्ल्यात दंगलखोरांनी पाच विमाने ताब्यात घेतली होती, परंतु उपमहापौरांनी नंतर सांगितले की, ‘विमानतळ दंगलखोरांपासून मुक्त झाले आहे आणि ते सामान्यपणे कार्यरत झाले आहे.’
कझाकिस्तान हा जगातील नवव्या क्रमांकाचा देश आहे. या देशाची सीमा ही उत्तरेला रशिया आणि पूर्वेला चीनच्या सीमेला लागून आहे. या देशाकडे कच्चा तेलाचे विपुल साठे आहेत. जे धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
तेलाचे साठे आणि खनिज संपत्ती असूनही या देशाच्या काही भागात लोकांना अत्यंत गरीबीत जगावे लागत आहे. त्यामुळे लोकांमध्ये सरकारविुद्धा असंतोष आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनपासून वेगळे झाल्यानंतर कझाकिस्तानमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये असंतोषही आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर 25-30 रूपये कमी केले असते तर मोठं मन दिसलं असतं-संजय राऊत
भारतात पेट्रोल 110 रुपयात
दुसरीकडे भारतात पेट्रोल 110 रुपयांच्या घरात गेलं आहे. पेट्रोलचे दर हे जवळजवळ 115 रुपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही 110 रुपयांच्या आसपास पोहचले होते. त्यामुळे भारतातही याबाबत असंतोष प्रचंड वाढला होता. पण काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर 5 आणि डिझेलवरील 10 रुपयांनी कमी केला होता.
ADVERTISEMENT