बिहारमधील सासाराम जिल्ह्यात रविवारी आरजेडी नेते विजेंद्र यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरजेडी नेते लालू यादव आणि तेजस्वी यांच्या जवळचे होते. ते कारघरचे प्रमुखही राहिले होते. सध्या PACS (प्राथमिक कृषी पतसंस्था) चे अध्यक्ष होते. कारघर पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जुन्या वैमनस्यातून त्यांची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
पूर्ववैमन्यसातून खून झाल्याची माहिती
बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन झाल्यापासून भाजप गुन्हेगारीचा मुद्दा पुढे करुन राज्यातील सरकारला सातत्याने घेरत आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे म्हणाले होते की, महागठबंधन सरकार स्थापन होताच गुन्हेगारांनी बिहारमध्ये नंगा नाच सुरू केला आहे. अलीकडेच एका सैनिकाची हत्या झाली, एका मुलीवर अत्याचार झाला. बिहारमध्ये हे काय चाललंय? काठीनं तेल पिणाऱ्यांचं सरकार आले आहे, त्यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य बुलंद झाले आहे.
आज सकाळी धान पिकात खत शिंपडण्यासाठी गेले असता गुन्हेगारांनी सकाळी 8.30 च्या दरम्यान ही घटना घडवून आणल्याचे नातेवाइकांनी सांगितले. एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली तर एक गोळी मानेला लागली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोकांनी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसएचओ नरोत्तम चंद्र यांनी सांगितले की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत. या घटनेमागची कारणेही शोधली जात आहेत.
दोन वर्षांपूर्वीही त्यांच्यावर हल्ला झाला होता
सुमारे दोन वर्षांपूर्वी स्थानिक बाजारपेठेतील सेमरी मोरजवळ त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र ते थोडक्यात बचावले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नाही.
ADVERTISEMENT