कल्याण : चालत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न फसला, सतर्क RPF जवानांमुळे वाचले प्रवाशाचे प्राण

मुंबई तक

• 11:20 AM • 18 Nov 2021

कल्याण रेल्वे स्थानकात सतर्क असलेल्या RPF जवानामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. चालत्या एक्स्प्रेस गाडीतून स्टेशनवर उतरत असताना अचानक गाडीचा वेग वाढल्यामुळे अंदाज न आलेला प्रवासी गाडीतून पडून फरफटत ट्रॅकखाली येणार होता. परंतू यावेळी RPF कर्मचाऱ्यांनी वेळेत प्रसंगावधान दाखवून या व्यक्तीला वाचवलं आहे. युनिस खान हे 54 वर्षीय गृहस्थ गुरुवारी सकाळी 9 वाजून 26  मिनिटांनी कल्याण […]

Mumbaitak
follow google news

कल्याण रेल्वे स्थानकात सतर्क असलेल्या RPF जवानामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. चालत्या एक्स्प्रेस गाडीतून स्टेशनवर उतरत असताना अचानक गाडीचा वेग वाढल्यामुळे अंदाज न आलेला प्रवासी गाडीतून पडून फरफटत ट्रॅकखाली येणार होता. परंतू यावेळी RPF कर्मचाऱ्यांनी वेळेत प्रसंगावधान दाखवून या व्यक्तीला वाचवलं आहे.

हे वाचलं का?

युनिस खान हे 54 वर्षीय गृहस्थ गुरुवारी सकाळी 9 वाजून 26  मिनिटांनी कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या मुंबई लखनऊ एक्स्प्रेसने जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी स्थानकात आले होते. नातेवाईकाचे सामान गाडीत ठेवण्यासाठी ते गाडीत चढले मात्र यानंतर गाडीतील गर्दी वाढल्याने त्यांना वेळेत गाडीतून खाली उतरता आले नाही.

इतक्यात फलाटावरून सुटलेल्या गाडीने वेग पकडल्याने चालत्या गाडीतून उतरणारे युनिस खान यांचा पाय घसरल्याने ते गाडीबरोबर फरपटत जाऊ लागले. यावेळी फलाटावर ड्युटीवर असलेले उपनिरीक्षक अनिल कुमार प्रधान, आरक्षक शेषराव पाटील, आरक्षक आर के यादव, विकास साळुंखे यांनी या प्रवाशाला गाडीबरोबर फरपटत जाताना पाहताच तातडीने धाव घेत त्याला वाचविले. खान याना किरकोळ दुखापत झाली आहे .आपला जीव वाचविणाऱ्या रेल्वे कर्मचार्यांना धन्यवाद दिले.  मागील 5 महिन्यात कल्याण रेल्वे स्थानकातील रेल्वे कमर्चार्यांनी विविध 6.घटनामध्ये मेल एक्स्प्रेस मधून पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

    follow whatsapp