महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे महाराष्ट्रावरुन गुजरातमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपली RTPCR टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. आपली कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्याचं दाखवल्यानंतरच त्यांना गुजरातच्या हद्दीत प्रवेश दिला जाणार आहे.
ADVERTISEMENT
मंगळवारी मध्यरात्रीपासून गुजरात सरकारने हा निर्णय घेतला असून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या भिलाड येथे सध्या नागरिकांची तपासणी होते आहे. गुजरात पोलिसांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी या भागात येणाऱ्या नागरिकांची सर्व कागदपत्र तपासत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही महत्वाची शहरं आणि जिल्ह्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाउन आणि संचारबंदीचे निर्णय घेण्यात येत आहेत.
कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता बीड जिल्ह्यात उद्यापासून (25 मार्च) रात्री 12 वाजेपासून ते 4 एप्रिलपर्यंत कठोक लॉकडाऊन असणार आहे. या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये, आस्थापनं बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. आज (24 मार्च) बीड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे. (10 days strict lockdown in beed district from march 26)
काय-काय बंद असणार?
-
बीड जिल्ह्यातील स्टेडियम, जिम, स्विमिंग पूल, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बंद राहणार आहेत.
-
शाळा महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था देखील या काळात बंद असतील.
-
सार्वजनिक, खाजगी वाहने, दुचाकी, चारचाकी वाहनांना बंदी असेल.
-
याशिवाय सर्व प्रकारची बांधकामे, चित्रपट गृहे, व्यायामशाळा, नाट्यगृह बंद असतील.
-
मंगल कार्यालय, हॉल, स्वागत समारंभ होणार नाहीत.
-
सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळं बंद असतील.
-
खाजगी कार्यालये बंद असतील.
नांदेडमध्ये १५ मार्चपासून शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, बाजार सुरु झाल्यामुळे गर्दी वाढत होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंधांची घोषणा केली. परंतू लोकांकडून या नियमांचं पालन न झाल्यामुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ व्हायला लागली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटंनकर यांनी २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात जिल्ह्यातील टू व्हिलर, फोर व्हिलर, सिटी बस आणि अन्य वाहनं बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या मेडीकल, हॉस्पिटल व इतर सेवांना या काळात दुकानं सुरु ठेवण्याची परवानवगी मिळाली आहे.
याशिवाय, परभणीतही बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं, औषधं दुकानं, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना या काळात प्रवासाची सूट मिळाली आहे. याव्यतिरीक्त किराणा मालाची दुकानं, दुध विक्री केंद्र यांना सकाळी सहा ते नऊ या काळात विक्रीची परवानगी मिळाली आहे. एका ठिकाणी थांबून विक्रेत्यांना आपल्या मालाची विक्री करता येणार नाहीये.
ADVERTISEMENT