Sheetal Mhatre: ‘आम्ही त्यांना फोडून काढतो’, व्हिडीओवरून रुपाली पाटलांचा चढला पारा

मुंबई तक

• 07:04 AM • 12 Mar 2023

Rupali Thombare Patil On Sheetal Mhatre and Prakash surve Viral Video: शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा यात्रेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याच व्हिडीओवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाष्य केलं आहे. रुपाली ठोंबरे पाटलांनी शीतल म्हात्रेंना पाठिंबा दिला, त्याचबरोबर काही सवालही […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

Rupali Thombare Patil On Sheetal Mhatre and Prakash surve Viral Video: शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा यात्रेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याच व्हिडीओवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाष्य केलं आहे. रुपाली ठोंबरे पाटलांनी शीतल म्हात्रेंना पाठिंबा दिला, त्याचबरोबर काही सवालही उपस्थित केले आहेत.

हे वाचलं का?

शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर पुण्यात माध्यमांशी बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या,”ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. महिला म्हणून आम्ही शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी आहोत, पणं जे पेरलं तेच उगवलं आहे. त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसत आहे”, अशी टीका रूपाली पाटील यांनी म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओवरून केलीये.

Sheetal Mhatre Video Case : रुपाली ठोंबरे पाटलांचं भाजप-शिंदे गटाकडे बोट

“आम्ही विरोधात असलो, तरी त्यांच्या पाठीशी आहोत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय आहे. भाजप आणि शिंदे गटातील काही जणांनी ही अशा अनेक महिलांचे व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे ही हिंमत वाढली आहे. व्हिडिओ खरा आहे की खोटा, हे तपास केल्याशिवाय कळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी राजकारणी महिला असं करतील असे वाटत नाही, ही खात्री आहे. पण खूप वाईट वाटलं”, असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंनाच सुनावलं

“म्हात्रे आता विरोधकांवर आरोप करत असेल, तर तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय, त्या लोकांनी तुमचा व्हिडिओ व्हायरल केला नाही ना? त्याचा तपास झाला पाहिजे. सगळ्या विरोधातील महिला शीतल म्हात्रे यांच्यासोबत आहोत”, अशी शंका रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केली.

“आता गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करुन कारवाई करावी. तसेच सोशल मीडियावर जे जे अंधभक्त व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर ही त्वरित कारवाई करावी, ही मागणी आहे”, असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

ठाकरे गटाची पाठराखण, रुपाली ठोंबरे पाटील नेमकं काय म्हणाल्या?

“ठाकरे गटातील कोणताही व्यक्ती अस करु शकत नाही. भाजप आणि शिंदे गट सातत्याने बदनामी करत आहे. आमचीही बदनामी करण्याचं काम भाजप आणि शिंदे गटाचं आहे. ठाकरे गटातील कुठलीही व्यक्ती असं करणार नाही, याची चौकशी करा. टीका करायची म्हणून बोलू नका. तुमच्यावर वेळ आली म्हणून तुम्हाला दुःख कळत, पणं अशी वेळ अनेक महिलांवर आली, यावर गप्प बसतात, आता तुम्ही यंत्रणा कामाला लावा. हे जर खरं असेल तर तशा प्रकारे विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. बदनामी केली, हा गुन्हाही दाखल होऊ शकतो”, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

sheetal Mhatre : व्हिडीओ व्हायरल, मध्यरात्री रंगलं नाट्य; शीतल म्हात्रे संतापल्या

यात जर अंधभक्त निघाले तर काय? रुपाली पाटलांचा भाजप-शिवसेनेला सवाल

“पण यात जर अंध भक्तच निघाले, तर सत्ताधारी काय करणार? त्याचंही सांगावं; नाहीतर आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही त्यांना फोडून काढतो, परत व्हिडिओ शूटिंग करायला हात पुढे राहणार नाही”, असा संताप रुपाली ठोंबरे पाटलांनी व्यक्त केला. “मी खात्रीशीर सांगते. जबाबदारीने सांगते. सोशल मीडियावर हे व्हायरल होणं घातक आहे. गृह खात्याने जागं होऊन यावर त्वरित कारवाई करणे गरजेचं आहे. फक्त शीतल म्हात्रे नव्हे, तर प्रत्येक महिलेवर जो अन्याय होतो त्यांना न्याया मिळाला पाहिजे”, असंही त्या म्हणाल्या.

    follow whatsapp