Russia-ukraine war : बायडेन पुतिन यांना म्हणाले, युद्ध गुन्हेगार; रशिया संतापला

मुंबई तक

• 04:19 AM • 17 Mar 2022

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या विधानावर रशियाने संताप व्यक्त केला आहे. बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल विधान केलं होतं. त्यावर हे विधान अक्षम्य अशा स्वरूपाचं असल्याचं पुतिन यांच्या कार्यालयाने म्हणजे क्रेमलिनने म्हटलं आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी बुधवारी बोलताना सांगितलं की, ‘अमेरिकेच्या अध्यक्षांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युद्धाचे गुन्हेगार […]

Mumbaitak
follow google news

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या विधानावर रशियाने संताप व्यक्त केला आहे. बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल विधान केलं होतं. त्यावर हे विधान अक्षम्य अशा स्वरूपाचं असल्याचं पुतिन यांच्या कार्यालयाने म्हणजे क्रेमलिनने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी बुधवारी बोलताना सांगितलं की, ‘अमेरिकेच्या अध्यक्षांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युद्धाचे गुन्हेगार म्हटलं आहे. हे अस्वीकार्य आणि कधीही माफ न करण्यासारखं विधान आहे.’ अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी वॉशिंग्टन मध्ये माध्यमांशी बोलताना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा उल्लेख करत त्यांना युद्धाचे गुन्हेगार म्हटलं होतं.

रशिया – युक्रेनच्या वादाचा भारतावर काय परिणाम होणार?

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून करण्यात आलेलं हे सर्वात टोकदार विधान आहे. युक्रेनवर हल्ला केल्याप्रकरणी यापूर्वी बायडेन यांनी रशियाला अनेकदा इशारा दिलेला आहे. १२ मार्च रोजी बायडेन यांनी पुतिन यांच्यावर दबाब वाढवण्यास आणि रशियाला जागतिक स्तरावर वेगळं पाडण्यास सक्षम असल्याचं म्हटलं होतं.

अमेरिकेने यापूर्वीच रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर रशियाने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर पलटवार केलेला आहे. १५ मार्च रोजी रशियाने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक अमेरिकी अधिकाऱ्यांवर अनेक निर्बंध लादले आहेत.

Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेनमधला वाद नेमका काय आहे? या वादाने तुमचा पैसा का बुडवतोय?

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं अमेरिकेकडून स्वागत

युक्रेनमधील लष्करी कारवाई तत्काळ थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाचं अमेरिकेनं स्वागत केलं आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटचे नेड प्राईस यांनी सांगितलं की, न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करण्याचा आम्ही रशियाला आग्रह करतो. आम्ही युक्रेनसोबत आहोत, असं ते म्हणाले.

    follow whatsapp