रशियन फौजा युक्रेनच्या राजधानीच्या उंबरठ्यावर; रक्तरंजित संघर्ष शिगेला, मिसाईलचा वर्षाव

मुंबई तक

• 10:27 AM • 25 Feb 2022

रशिया-युक्रेन यांच्यातील वाद आता रक्तरंजित संघर्षात बदलला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला असून, रशियन फौजा आता युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवर येऊन पोहोचल्या आहेत. रशियन लष्कराला रोखण्यासाठी युक्रेनचं लष्कर शर्थीचे प्रयत्न करत आहे. रशियाने हल्ला चढवल्यानंतर युक्रेनमध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे. नागरिक स्वतःचे आणि मुलांचे जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. युक्रेनचं लष्कर रशियन फौजांना तोंड देत […]

Mumbaitak
follow google news

रशिया-युक्रेन यांच्यातील वाद आता रक्तरंजित संघर्षात बदलला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला असून, रशियन फौजा आता युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवर येऊन पोहोचल्या आहेत. रशियन लष्कराला रोखण्यासाठी युक्रेनचं लष्कर शर्थीचे प्रयत्न करत आहे.

हे वाचलं का?

रशियाने हल्ला चढवल्यानंतर युक्रेनमध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे. नागरिक स्वतःचे आणि मुलांचे जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. युक्रेनचं लष्कर रशियन फौजांना तोंड देत आहे. रशियाविरोधातील लढाईत आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची नाराजी आता युक्रेनच्या नेतृत्वाकडून व्यक्त होत असून, रशियन लष्कर आक्रमण करत राजधानी कीवपर्यंत पोहोचलं आहे.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे युक्रेनच्या कीव मधील संसदेपासून रशियन लष्कर 9 किमी दूर असल्याचं सांगण्यात आलं आहे. रशियन लष्काराला पेट्रोल बॉम्बने प्रत्युत्तर देण्याचं आवाहन संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.

रशियाकडून करण्यात आलेल्या लष्करी कारवाईने युक्रेनमधील जनजीवन पूर्णपणे कोलमडून पडलं आहेत आतापर्यंत लष्करी संघर्षात युक्रेनमधील 137 नागरिकांना जीव गमवावा लागला असून, 316 नागरिक जखमी झाले आहेत. रशियाकडून सातत्याने युक्रेनमधील विविध ठिकाणांवर मिसाईलचा मारा केला जात आहे.

युक्रेनच्या दक्षिण पूर्व सीमेवरील लष्करी चेकपोस्ट रशियाने मिसाईल डागली. या माऱ्यात तेथील सैनिकांना जबर दुखापत झाल्याची माहिती आहे. रशियाकडून युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता वाढतच असून, युक्रेनचं लष्कर प्रत्युत्तर देताना दिसत आहे. या संघर्षादरम्यानची अनेक छायाचित्र आणि व्हिडीओ आता समोर येऊ लागली आहेत.

एक व्हिडीओ समोर आला असून, रशियन युद्धनौकेवरील जवानांनी युक्रेनच्या 13 जवानांना हल्ला करून ठार केल्याचं दिसत आहे. रशियन युद्धनौकेवरील जवानांनी युक्रेनच्या जवानांना शरण या असं म्हटलं, मात्र त्याला युक्रेनच्या जवानांनी नकार दिल्यानंतर रशियन जवानांनी थेट हल्ला करत जवानांना मारलं.

Ukraine Russia War : स्फोटांनी हादरली राजधानी कीव, रशियाच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 137 जणांचा मृत्यू

दरम्यान, कीव शहरातील रहिवाशी भागात असलेल्या एका इमारतीवर रशियन लष्कराने सहा वेळा मिसाईल डागल्या. यात हल्ल्यावेळी युक्रेन लष्कराने एक रशियन विमान हल्ला करून पाडलं. हे विमान युक्रेनची राजधानी कीवमधील एका रहिवाशी इमारतीवर कोसळलं.

Ukraine-Russia युद्धामुळे स्मार्टफोन महागणार?

दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर जगभरातून रशियावर निर्बंध लादले जात आहे. ब्रिटनसह अनेक देशांनी रशिया आणि रशियाशी संबंधित असलेल्या सेवा आणि व्यक्तींवर बंदी घातली असतानाच आज रशियाने ब्रिटनच्या विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे. ब्रिटनमधील विमानांना आता रशियाच्या हवाई हद्दीतून जाण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.

    follow whatsapp