रशिया आणि युक्रेन यांच्यातला रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. पाच दिवसांपासून रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे. युक्रेनवर मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीवसही इतर शहरांमध्ये हल्ले केले आहेत. त्यामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे तसंच मालमत्तेचंही नुकसान झालं आहे.
ADVERTISEMENT
युक्रेनच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 352 युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 14 लहान मुलांचाही समावेश आहे. तर एक हजाराहून जास्त नागरिक जखमी झाले आहेत अशीही माहिती युक्रेनच्या गृह मंत्रालयाने दिली आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात 1684 नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये 116 लहान मुलांचा समावेश आहे. येत्या काळात मृतांची संख्या आणि जखमी लोकांची संख्या वाढू शकते असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे किती सैनिक मारले गेले याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
एकीकडे युक्रेनने 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलेलं असताना रशियाने मात्र आम्ही फक्त युक्रेनी सैन्यावर हल्ला केल्याचं म्हटलं आहे. रशियाने हा दावाही केला आहे की आम्ही जे मिसाईल हल्ले केले आहेत त्यात रशियाच्या नागरिकांचं काहीही नुकसान झालेलं नाही. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे काही सैनिक मारले गेले आहेत. रशियाने पाच दिवसात हे पहिल्यांदाच मान्य केलं आहे की आमच्या हल्ल्यात युक्रेनचे सैनिक मारले गेले आहेत.
रशियाने हेदेखील स्पष्ट केलं आहे की आमचेही काही सैनिक मारले गेले आहेत आणि काही सैनिक जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT