पुढच्या आठवड्यापासून भारतात Sputnik V ही रशियाची लस उपलब्ध होणार आहे. दोन बिलियन डोस पुढील पाच महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून Sputnik V या लसीची विक्री भारतात सुरू होणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यापासून भारतात या लसीचं उत्पादित होऊन लस मिळू शकणार आहे.
ADVERTISEMENT
देशात कोरोनाचं संकट गहिरं झालं आहे. यासंदर्भात आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल, डॉ. बलराम भार्गव, आयसीएमआर आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल उपस्थित होते.
Sputnik Light : कोरोनाला रोखण्यासाठी नव्या लसीचा एक डोस पुरेसा, कंपनीची घोषणा
लव अग्रवाल यांनी काय सांगितलं?
देशातल्या 187 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दोन आठवड्यांपासून कमी होते आहे. तर 24 राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्क्यांपर्यंत आहे. तर 12 राज्यं अशी आहेत ज्यामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. एवढंच नाही तर स्पुटनिक व्ही ही लस भारतात पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT