ADVERTISEMENT
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकतंच पत्नी अंजली तेंडुलकरसह जंगल सफारीचा आनंद लुटला.
जगप्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्यात सचिन तेंडुलकरने पत्नीसोबत सुट्टी एन्जॉय केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सचिनने भेट दिली. यावेळी एका वाघिणीसह चार बछड्यांचं दर्शन घेतलं.
यावेळी सचिन तेंडुलकरने एक पत्र लिहून ताडोबा प्रशासनाचे आणि व्यवस्थापनाचे कौतुकही केलं आहे.
सचिनने लिहिलेल्या पत्रात, ताडोबात पाच वाघ दिसल्याचा उल्लेख केला आहे.
ताडोबाचे अधिकारी-वनरक्षक कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे ताडोबा हे सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प ठरलं असल्याचं सचिनने मान्य केलं आहे.
ताडोबात वाघाचे दर्शन व्हावे यासाठी येथील कर्मचार्यांकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी समाधान व्यक्त केलं.
ADVERTISEMENT