मनसुख हिरेन हा कच्चा दुवा ठरेल असं वाटल्याने सचिन वाझेंनी त्याची हत्या केली अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. अँटेलिया प्रकरणाचा तपास NIA कडून सुरू आहे. तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचाही तपास NIA कडूनच सुरू आहे. सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर मनसुखची हत्या केल्याचा आरोप आहे. अशात आता एनआयएच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मनसुख हिरेन हा अँटेलिया प्रकरणातला कच्चा दुवा ठरू शकतो असं सचिन वाझेंना वाटलं त्यामुळे वाझेंनी त्याची हत्या केली असं आत्तापर्यंतच्या तपासानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेला वाटतं आहे. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
टिप्सी बारची रेड, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे, जाणून घ्या काय आहे कनेक्शन?
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत धूर्तपणे सचिन वाझेंनी अँटेलियासमोर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याचा कट आखला. मात्र एटीएएस आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणांनी मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ चोरीला कशी गेली याचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा तपास करत असताना मनसुख हिरेनच्या कार चोरीला गेल्याच्या तक्रारीवर या दोन्ही तपासयंत्रणांना संशय आला. कारण १७ तारखेला कार बंद पडली आणि १८ तारखेला चोरी गेली असं मनसुख हिरेन यांनी म्हटलं होतं. हीच कार अँटेलियाबाहेर सापडणं, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरचं सीसीटीव्ही फुटेज या सगळ्यामुळे मनसुख यांनी केलेल्या तक्रारीत काही तथ्य नसल्याचं तपासात समोर आलं.
सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?
सचिन वाझे हे आपला बचाव करणार होते म्हणून त्यांनी मनसुखला तू गुन्हा मान्य करून टाक मी तुला सोडवेन असंही सांगितलं होतं. मात्र मनसुख हिरेन यांनी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ अँटेलियासमोर ठेवली आरोप आपल्या अंगावर घ्यायला नकार दिला. त्यामुळे सचिन वाझे यांनी रचलेला कट फसला. सचिन वाझेंनी या प्रकरणात बनावट सीम कार्ड आणि नंबर प्लेट वापरल्या. मनसुख हिरेनच्या स्कॉर्पिओचा चेसी नंबरही त्यांनी खोडला.. जेणेकरून या कारचा मालक कोण आहे ते समजू नये हाच त्यामागचा उद्देश होता असंही एनआयएच्या सूत्रांनी म्हटलं आहे. मात्र तरीही एटीएस मनसुख हिरेनपर्यंत पोहचलंच.. मनसुख हिरेनला सोडून द्या कारण हे प्रकरण माझ्या युनिटच्या अंतर्गत येतं असंही सचिन वाझेंनी सांगितलं होतं अशीही माहिती एनआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मनसुख हिरेन हत्येप्रकरणात वाझे मुख्य आरोपी, एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचाही हात: ATS
मनसुख हिरेनची जर कसून चौकशी झाली तर तो जो काही ठरलेला कट आहे तो एटीएसला सांगून टाकेल. त्यामुळे आपलं पितळ उघडं पडेल अशी भीती सचिन वाझेंना वाटली. त्यामुळेच सचिन वाझेंनी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचला. तसंच मनसुख हिरेनने आत्महत्या केली आहे असंही त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीजवळ आढळला आणि या खुनाला वाचा फुटली.
ADVERTISEMENT