बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी घडलेल्या घटनेच्या तीन दिवसांनंतर, अभिनेत्यावर चाकूने वार करणाऱ्या संशयित हल्लेखोराचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या CCTV मध्ये आरोपी, एका दुकानात एअरफोन खरेदी करताना दिसत आहे. त्यानं निळा शर्ट घातला असून, त्याच्या पाठीवर एक काळी बॅगही लटकवलेली आहे. याआधी मुंबई पोलिसांनी आणखी काही सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते. यापैकी एक सीसीटीव्ही फुटेज सतगुरु शरण बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरील आहे. यामध्ये संशयित व्यक्ती अनवाणी पायऱ्या चढताना दिसत आहे. दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, संशयित व्यक्ती वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ पिवळ्या शर्टमध्ये दिसला. तो सतत त्याचं स्थान बदलत असतो असं आतापर्यंत आढळून आलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Saif Ali Khan Case : रेल्वेने पळून गेला आरोपी? पोलिसांकडून तपासले जातायत लोकल आणि एक्सप्रेसमधले CCTV
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी मोठी ताकद लावली असून, सतत वेगवेगळ्या ठिकाणी चौकशा सुरू आहेत. अभिनेत्यावरील हल्ल्याला तीन दिवस उलटूनही, आरोपी अजूनही फरार आहे. हल्लेखोराला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी 35 पथकं तयार केली आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. जबाब नोंदवलेल्यांपैकी बहुतेक लोक हे ओळखीचे लोक होते. ज्यामध्ये सैफ अली खानची पत्नी करीना कपूर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मुंबई पोलिसांनी ऑटो चालक भजन सिंग राणा याचीही चौकशी केली आहे. सैफ अली खानला जखमी अवस्थेत याच रिक्षा चालकाने लीलावती रुग्णालयात नेलं होतं.
ADVERTISEMENT
