मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास करतेय. या प्रकरणात, रविवारी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद याला अटक केली. हा आरोपी विजय दास या नावाने मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता. मंगळवारी पोलिसांनी आरोपीला सैफच्या वांद्रे येथील गुरु शरण अपार्टमेंटमध्ये नेले. तिथे पुन्हा क्राइम सिन तयार करण्यात आला होता. एकूणच या संपूर्ण चौकशीत आरोपीने सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
1. सैफ अली खानच्या फ्लॅटमधून काय पुरावे सापडले?
पोलिसांना सैफ अली खानचा धाकटा मुलगा जेह याच्या खोलीतून आरोपी शहजादची टोपी सापडली. या टोपीमध्ये आरोपीचे केसही आढळले, जे डीएनए चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी भेट दिली. यावेळी, घटनास्थळी आरोपीच्या बोटांचे ठसेही आढळलेत. यामध्ये तो ज्या बाथरूमच्या खिडकीतून आत आणि बाहेर गेला त्याचीही तपासणी करण्यात आली. तसंच डक्टमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरलेली शिडीही तपासण्यात आली.
2. आरोपी शहजादने सैफ अलीवर वार का केले?
हे ही वाचा >> पत्नीचे अश्लील फोटो काढले अन् मित्रालाच पाठवले, मित्राकडून महिलेकडे सेक्सची मागणी...
चौकशीदरम्यान, आरोपी शहजादने पोलिसांना सांगितलं की, सैफ अली खानने मला अडवलं आणि घट्ट पकडलं होतं, त्यातून सुटका करण्यासाठी त्याच्या पाठीवर अनेक वेळा चाकूने वार केले. तसंच या हल्ल्यानंतर तो त्यांच्या फ्लॅटमधून पळून गेला. यानंतर तो सुमारे दोन तास इमारतीच्या बागेत लपून राहिला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "आरोपी चोरीच्या उद्देशानं बाथरूमच्या खिडकीतून सैफच्या सतगुरु शरण इमारतीतील फ्लॅटमध्ये घुसला. घरात प्रवेश केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिलं."
3. आरोपी सैफच्या तावडीतून कसा सुटला?
आरोपीने घरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर, आवाज ऐकून सैफ अली खान 12 व्या मजल्यावरून खाली आला. धोका लक्षात घेऊन सैफ आरोपीला भिडला आणि त्याला समोरून आरोपीला घट्ट पकडलं. सैफने पकडल्यानंतर आरोपीला हालताच आलं नाही, म्हणून त्याने सैफच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्यांच्या पाठीत चाकूने वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. यामुळेच आरोपी सैफच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले.
4. आरोपी शहजाद बांगलादेशहून मुंबईत कसा पोहोचला?
हे ही वाचा >>Saif Ali Khan Discharge : सैफ अली खान घरी पोहोचला, गाडीतून उतरून रूबाबात चालत गेला
हल्लेखोर अजूनही आत आहे असं समजून सैफ अली खानने त्याच्या फ्लॅटचा दरवाजा बंद केला. पण तो ज्या मार्गाने आत आला होता त्याच मार्गाने पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर आरोपी खाली आला आणि इमारतीच्या बागेत दोन तास लपून राहिला. बांगलादेशातील झलोकाठी जिल्ह्यातील रहिवासी असलेला फकीर पाच महिन्यांहून अधिक काळ मुंबईत राहत होता. तो छोटी-मोठी कामं करायचा. एका हाऊसकीपिंग एजन्सीशी तो संबंधित होते.
5. बांगलादेशी घुसखोराला सिम कार्ड कसं मिळाले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचं नाव बदलून विजय दास असं ठेवलं होतं. सात महिन्यांपूर्वी त्याने अनधिकृत नागरिक म्हणून भारतात प्रवेश करण्यासाठी नदीचा वापर केला होता. पश्चिम बंगालमध्ये सुमारे 8 वर्ष राहिल्यानंतर, मी नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला. असे बरेच अवैधपणे आधार कार्डचा वापर करून सिम मिळवतात. त्यानं वापरलेलं सिम कार्ड पश्चिम बंगालमध्ये खुकमोनी जहांगीर शेखा यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
ADVERTISEMENT
