बँक हॉलिडे असला तरीही तुमच्या खात्यात पगार जमा होणार, RBI ने घेतला मोठा निर्णय

मुंबई तक

• 12:16 PM • 04 Jun 2021

नवी दिल्लीः तुमच्यासोबत आतापर्यंत असं बऱ्याचदा घडलं असेल की, एखाद्या महिन्यात पगाराच्या दिवशी बँकेची सुट्टी आहे आणि तुमचा पगार उशीर झाला आहे किंवा असंही झालं असेल की, तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI)यासाठी ऑटोमॅटिक पेमेंटचा पर्याय निवडला आहे पण बँक हॉलिडेमुळे तो लेट झाला आणि तुम्हाला एक्ट्रा चार्जेस भरावे लागेल. अशा समस्यांना जर आपल्याला सामोरं जावं […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्लीः तुमच्यासोबत आतापर्यंत असं बऱ्याचदा घडलं असेल की, एखाद्या महिन्यात पगाराच्या दिवशी बँकेची सुट्टी आहे आणि तुमचा पगार उशीर झाला आहे किंवा असंही झालं असेल की, तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI)यासाठी ऑटोमॅटिक पेमेंटचा पर्याय निवडला आहे पण बँक हॉलिडेमुळे तो लेट झाला आणि तुम्हाला एक्ट्रा चार्जेस भरावे लागेल. अशा समस्यांना जर आपल्याला सामोरं जावं लागलं असेल तर आरबीआय (RBI) लवकरच आपली ही समस्या दूर करणार आहे.

हे वाचलं का?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी नॅशनल National Automated Clearing House (NACH)सुविधेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. याचा फायदा तुम्हाला ऑगस्टपासून होणार आहे.

NACH काय आहे?

प्रथम Nach म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते ते आपण जाणून घेऊयात. नॅच ही एक बल्क पेमेंट सिस्टम आहे, जी National Payment Corporation Of India (NPCI) द्वारे चालविली जाते.

NACH चा उपयोग हा सरकारी विभाग आणि कंपन्या लोकांच्या खात्यात वेतन, पेन्शन, लाभांश किंवा अनुदान इ. देण्यासाठी पैसे वापरतात. दुसरीकडे, कर्ज ईएमआय, विमा प्रीमियम, म्युच्युअल फंडाचा हप्ता, वीज, पाणी, फोन आणि गॅसचं बिल हे NACH या सुविधेद्वारे लोकांच्या खात्यातून डिडक्ट केली जाते.

बँक हॉलिडे असल्यास पेमेंट डिडक्ट होत नाही!

NACH ची सुविधा आता देखील बँक हॉलिडेच्या दिवशी मिळत नाही. हे अशाप्रकारे समजून घ्या की, जर आपला पगार जमा करण्याचा दिवस शनिवार-रविवार किंवा कोणत्याही सणामुळे बँक हॉलिडे असेल तर त्या दिवशी Nach न चालल्यामुळे आपला पगार उशिरा होऊ शकतो. यामुळे, आपल्या कर्जाचा ऑटोमॅटिक ईएमआय, पीपीएफ किंवा म्युच्युअल फंड, बचत हप्ता हे सर्व उशिरा डिडक्ट होऊ शकतं. ज्यासाठी आपल्याला अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागतं. पण आता आरबीआयने या समस्येवर तोडगा काढणार असल्याचं म्हटलं आहे.

संपूर्ण आठवडाभर मिळणार ऑटोमॅटिक पेमेंटची सुविधा

लोकांच्या अडचणी लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने वर्षभर आठवड्यातून सात दिवस NACH चालविण्याची घोषणा केली आहे. ही सुविधा 1 ऑगस्ट 2021 पासून कार्यान्वित होईल. RBI चं म्हणणं आहे की, RTGSची सुविधा आठवड्याच्या सात दिवसही सुरू केली गेली आहे. याचा फायदा घेत आम्ही वर्षभर NACH चालवण्यास सुरूवात करणार आहोत. ग्राहकांच्या हिताच्या सुविधा लक्षात घेऊन हे पाऊल उचलले गेले आहे. ऑटोमॅटिक पेमेंट सुविधेतील या बदलाचा फायदा घेण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या खात्यात पुरेशी रक्कम ठेवण्याची आवश्यकता आहे.

शुक्रवारी आरबीआयने आपले दोन-मासिक चलनविषयक धोरण जाहीर केले. त्यात पॉलिसीचे व्याज दर बदललेले नाहीत.

    follow whatsapp