औरंगाबाद : कोणताही शासकीय प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी राजकारण्यांची इच्छाशक्ती किती महत्वाची ठरती याचा अनुभव नुकताच घाटी रुग्णालयाला आला. त्याचं झालं असं की, पालकमंत्री संदिपान भुमरे यांना लाईटचा फटका बसताच पाच वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी त्यांनी अवघ्या ३ दिवसांमध्ये पूर्ण केली. त्यामुळे रुग्णालयातील दंत विभागात आता विनाअडथळा उपचार मिळू शकणार आहेत.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात दंतोपचार घेतले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच ५ मिनिटांसाठी विद्युत पुरवठा खंडीत झाला अन् रुग्णालय प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. त्यानंतर तातडीने महावितरण अधिकाऱ्यांना संपर्क करण्यात आला. पण तोपर्यंत मोबाइल टॉर्चच्या सहाय्याने त्यांची तपासणी करण्यात आली.
यानंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे म्हणाले की, ५ वर्षांपासून जनरेटरचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे पडून आहे. शुक्रवारी विजेची समस्याही असतेच. त्यानंतर भुमरे यांनी लगेच जनरेटरचा विषय डीपीसी बैठकीत ठेवण्याचा शब्द दिला. त्यानुसार सोमवारी पार पडलेल्या डीपीसी बैठकीत जनरेटचा विषय ठेवण्यात आला, अन् त्यासाठी ५७ लाख रुपयांच्या निधीची मंजूरीही देण्यात आली.
यावरुन अंबादास दानवे यांनी भुमरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. दानवे म्हणाले की, सरकारी रुग्णालयात लाईट गेल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे अनेक ऑपरेशन थांबतात. मात्र, आमचे मंत्री महोदयांना त्रास झाल्याबरोब लगेचचं जनरेटर मिळालं आहे. यामुळे आता सर्व रुग्णालयामध्ये या मंत्र्यांना घेऊन जावं का म्हणजे तेव्हाच तेथील प्रश्न सुटतील का?,असा खोचक सवाल केला आहे.
ADVERTISEMENT