धक्कादायक ! पोलिसाचे महाविद्यालयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला अटक

मुंबई तक

• 03:14 PM • 22 Nov 2021

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महाविद्यालयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार व खंडणी मागितल्या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेमुणकीस असलेला पोलीस कर्मचारी देवकर व त्याच्या बरोबर असलेले पोलीस कर्मचारी […]

Mumbaitak
follow google news

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महाविद्यालयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार व खंडणी मागितल्या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हे वाचलं का?

इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेमुणकीस असलेला पोलीस कर्मचारी देवकर व त्याच्या बरोबर असलेले पोलीस कर्मचारी २७ ऑक्टोबरला पहाटे तीन वाजता पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा पिडीत मुलगा हा त्याच्या मैत्रिणीला भेटून पुन्हा त्याच्या वसतीगृहात जात होता. तेव्हा पोलिसांनी त्यास अडवून, आता कुठून आलास, इथे काय करतोस असं विचारलं. ज्याला पीडित मुलाने मैत्रिणीला भेटून आलो असं उत्तर दिलं.

त्यावेळी आरोपी हणमंत देवकर याने पिडीत मुलाची चौकशी करून त्याचा मोबाईल नंबर घेतला. २९ ऑक्टोबर रोजी पोलीस हणमंत देवकर याने मोबाईलवरून फोन करून, कॉलेजच्या गेटवर भेटायला ये असे सांगितले. भेटायला गेलेवर त्यास त्याचे मैत्रिणीचे प्रेमप्रकरणावरून धमकावून पैशाची मागणी केली. तुच्या घरी व मैत्रिणीचे घरी तुमच्या प्रकरणाबाबतची माहिती देणार असल्याचे धमकावले. घाबरलेल्या तरुणाने कॉलेजमधील मित्रांकडून ४ हजार रुपये उसने घेत हणमंत देवकर यांना दिले.

मुलीला कारमधून पळवलं; पंढरपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिकमध्ये केला बलात्कार

परंतू देवकरचं एवढ्यावर समाधान झालं नाही. त्याने पीडित मुलाला तुझ्या मैत्रिणीला नंबर दे आणि तिला माझ्यासोबत सेक्स करायला सांग असं सांगितलं. यावर पीडित मुलाने असं करण्यास स्पष्ट नकार दिला. यावर देवकरने पीडित मुलाला जर तुझ्या मैत्रिणीसोबत सेक्स करायला नकार देत असशील तर मी तुझ्यासोबत सेक्स करणार असं सांगितलं. ज्यानंतर पीडित मुलगा चांगलाच घाबरला. यानंतर आरोपी देवकरने पीडीत मुलाला तुझ्या रुमवर चल मला तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे असं सांगितलं.

यानंतर पीडित मुलगा देवकरला आपल्या रुममध्ये घेऊन गेला आणि त्याने आपल्या मित्राला बाहेर जायला सांगितलं. यावेळी देवकरने पीडीत मुलासोबत अनैसर्गिक संभोग केला. यावेळी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन देवकर निघून गेला. २१ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वा . चे सुमारास आरोपी हणमंत देवकर याने पुन्हा पिडीत मुलास त्याचे मोबाईलवरती फोन करून कॉलेजच्या गेटवर बोलावून संभोगाची मागणी केली. यावेळी देवकरने मोबाईलमधला त्याचा संभोगाचा व्हिडीओ दाखवला.

आज तू माझ्यासोबत आला नाहीस तर तुझा व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिल्यानंतर पीडीत तरुण चांगलाच घाबरला. यानंतर त्याने आपल्या मित्राला विश्वासात घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी हणमंत देवकरला अटक केली आहे.

    follow whatsapp