डेअरिंग तर बघा! शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून चक्क ५० हजारांचं बंडल केलं लंपास

मुंबई तक

• 07:10 AM • 30 Mar 2022

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून ५० हजारांचं बंडल पळवल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला आहे. सांगलीमध्ये ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री विजय वडेट्टीवार आणि अनेक नेत्यांची यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांचा सत्कार करत असताना एका भुरट्या चोरांनी त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. चक्क स्टेजवर येऊन पन्नास हजार रुपये चोरट्याने […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून ५० हजारांचं बंडल पळवल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला आहे. सांगलीमध्ये ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री विजय वडेट्टीवार आणि अनेक नेत्यांची यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांचा सत्कार करत असताना एका भुरट्या चोरांनी त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले.

हे वाचलं का?

चक्क स्टेजवर येऊन पन्नास हजार रुपये चोरट्याने चोरले. त्या चोरट्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे. चोरी प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

काय घडला प्रकार?

सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्या खिशातून ५० हजारांच्या नोटांचं बंड भुरट्या चोराने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेसचे नेते आणि मदत तसंच पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी मेळावा पार पडला. त्यावेळी भर स्टेजवर ही घटना घडली ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या. पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    follow whatsapp