–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले. सोमय्यांच्या आरोपावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली. त्याचबरोबर सोमय्या काय देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत का?, असा उलट सवालही केला.
नागपूर येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले,”ते (किरीट सोमय्या) काय या देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहेत का? जसं सिरीयल किलर असतात, काही सिरीयल रेपिस्ट असतात, तसे काही सिरीयल कम्प्लेटंट लोक आहेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून, त्यांच्यावर दबाब आणून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कारवाया करायला भाग पाडलं जात आहे.”
नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय?; सोमय्यांचा नवा सवाल
“मी कालपासून नागपूरला आहे. मी नागपूरचे पूल, मेट्रोचे पूल, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट याच्याबाहेर कुठे मला भाजपचे प्रमुख लोक मला भीक मागताना दिसतात का याचा विचार करत होतो. आम्ही फक्त ईडीच्या रडारवर आहोत. आमच्याकडे पैसे आहेत म्हणे. याची लोकं काय भीक मागताहेत का?”, असा उलट सवाल राऊतांनी केला आहे.
“या देशातील सर्व बिल्डर, उद्योगपती, हवालावाले, ब्लॅक मार्केटवाले, हे यांचे देणगीदार आहेत. त्यांच्या पैशांवर यांचे पक्ष तरारले आहेत. त्यांच्या पैशावर हे सरकारं आणतात आणि पाडतात. केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल, तर त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा लागेल.”
शिवसेनेच्या आणखी सहा नेत्यांचे घोटाळे समोर येणार; सोमय्यांकडून ठाकरेंची कोंडी
“काही लोकांना दिलासा दिला जातो, मात्र आमच्या तक्रारीवर काहीच होत नाही. २५ लोक आहेत ज्यांच्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो. परमवीर सिंग यांच्यासारख्या २५ लोकांना दिलासा मिळाला, मात्र महाविकास आघाडीच्या कुठलाही नेत्यांना दिलासा मिळत नाही,” असं सांगतानाच “जितेंद्र नवलानी यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर पद्धतीने होईल,” असं राऊत म्हणाले.
नोटबंदीनंतर शेल कंपन्या स्थापन करून काळा पैसा पांढरा करण्यात आल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली आहे. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “गुजरातमधील अहमदाबाद येथील एका बँकेमध्ये चार दिवसांत ६५० कोटी रुपये कसे जमा झाले होते?”, असं म्हणत राऊतांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरच निशाणा साधला.
ADVERTISEMENT