Maharashtra Politics : विरोधी पक्षांची बैठक अलिकडेच बंगळुरूमध्ये पार पडली. या बैठकीत इंडिया असं नावही या आघाडीला देण्यात आलं. पण, या बैठकीला जाण्यापूर्वीचा एक किस्सा शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये सांगितला. याच लेखात राऊत यांनी मोदींनाही टोले लगावले आहेत. विरोधकांमुळेच मोदींना एनडीएचा जीर्णोद्धार करावा लागला, असं राऊतांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊतांनी लेखात म्हटलं आहे की, “काँग्रेसची मजबूत सत्ता असलेल्या कर्नाटकची राजधानी बंगळुरात देशातील 26 प्रमुख पक्षांचे एक संमेलन पार पडले. देशात 2024 साली लोकशाहीवाल्यांचे राज्य व्हावे, धर्मांधता व हुकूमशाहीचे राज्य नष्ट व्हावे यासाठी हे सगळे एकत्र आले व त्यांचे एकत्र येणे यशस्वी झाले. कारण त्याच दिवशी आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विस्कटलेल्या ‘रालोआ’ म्हणजे ‘एनडीए’ची जमवाजमव करून दिल्लीत बैठक घ्यावी लागली. हे बंगळुरू बैठकीचे यश म्हणावे लागेल.”
संजय राऊत आणि राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या नेत्यांमध्ये काय झाला संवाद?
“बंगळुरूसाठी विमानतळावर निघताना मुंबईतील एका हाटेलात राष्ट्रवादीतून भाजपात सामील झालेल्या नेत्याची भेट अचानक झाली. ते ‘एनडीए’ बैठकीसाठी दिल्लीत निघाले होते. मी सांगितले, “आम्ही बंगळुरात निघालोय.” यावर त्यांचा प्रश्न, “तेथे जाऊन आता काय साध्य होणार?”
“काय होणार? ते शेवटी जनताच ठरवेल. मोदी ज्यांना स्वत:चे वैयक्तिक शत्रू समजतात त्या सगळ्या देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केला आहात,” असे मी म्हटले. त्यावर ते म्हणाले, “विरोधी पक्षांचे ऐक्य आता कशासाठी?”
वाचा >> Exclusive : ‘नग्न धिंड, बलात्कार अन्…’, माजी सैनिकाने सांगितली ‘त्या’ व्हिडिओची हादरवून टाकणारी गोष्ट
“मोदी-शाहांचा पराभव करण्यासाठी!”
“मोदीचा पराभव का करायचा?” प्रश्न.
“देशातील हुकूमशाही संपवून लोकशाही टिकविण्यासाठी. आज सत्तेचे, संपत्तीचे विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता व संपत्ती फक्त दोन-चार लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते काय?” माझा प्रश्न.
वाचा >> Irshalwadi Landslide : 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 27 जणांची दुर्दैवी मृत्यू,अखेर मृतांची नावं आली समोर
“चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही… त्यामुळे मोदी हवेत.” असे ते म्हणाले.
“2024 ला मोदी जातील. तेव्हा काय कराल?”
“ते खरेच जातील काय?”
“जातील हे नक्की!” मी ठामपणे सांगितले. त्यांच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.
मोदींची ऐट व्यर्थ आहे, राऊतांची टीका
संजय राऊतांनी म्हटलं आहे की, “हुकूमशाहीविरुद्ध ‘इंडिया’ एकवटल्याचे ते चित्र प्रेरणादायी होते. बंगळुरात ‘इंडिया’ एकत्र आले म्हणून दिल्लीत भाजपने ‘एनडीए’ गोळा केले. त्यात 38 पक्ष होते. त्यातील 26 पक्षांचे त्या त्या राज्यातही अस्तित्व नव्हते. काही पक्ष तर तालुका स्तरावरच होते. महाराष्ट्रातून विनय कोरे, बच्चू कडू, गोव्यातून सरदेसाई हे त्या 38 मध्ये होते. या 26 पक्षांचा एकही खासदार नाही, पण 38 पक्षांचा नवा एनडीए निर्माण करून मोदी ऐट दाखवत आहेत ती व्यर्थ आहे. मोदी एकटे सगळ्यांवर भारी! असे स्वत: अनेकदा मोदी यांनी छाती ठोकीत सांगितले, पण त्यांनाही शेवटी 2024 साठी ‘एनडीए’चा जीर्णोद्धार करावा लागला”, असं भाष्य राऊतांनी केलं आहे.
ADVERTISEMENT