Sanjay Raut, Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde : ‘भाजप 240 जागा लढवण्याच्या विचारात आहोत, शिंदेंचे पन्नासच… कारण पन्नासच्या वर त्यांच्याकडे कुणी नाही’, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि राजकारण रंगलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंच्या याच विधानावरून एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना खडेबोल सुनावलेत.
ADVERTISEMENT
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर खासदार संजय राऊत म्हणाले, “ही त्यांची लायकी आहे. ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती, 2014 साली. स्वाभिमानासाठी. 40-45 जणांवर तुकडे फेकलेले आहेत. यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील. ते तुकडे तोंडात ठेवूनच चघळत त्यांना जगावं लागेल. त्यांना कुठला स्वाभिमान आहे.”
याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांना सांगतात की, तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ. उद्या पाच जागा फेकतील यांच्या तोंडावर. ही यांची लायकी आहे. म्हणून भाजप शिवसेना तोडली, ती यासाठीच. त्यांना या महाराष्ट्रातील शिवसेनेचा रुबाब, दरारा हा संपवायचा होता म्हणून शिवसेना तोडली. महाराष्ट्राचा स्वाभिमान तोडायचा होता म्हणून शिवसेना तोडली. सगळे मिंधे लोक त्यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणार आहेत. खरी शिवसेना कोणती, याचा फैसला जनता करेल.”
शिंदेंच्या शिवसेनेला 48 जागा? जागा वाटपाबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
खेडच्या गोळीबार मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा, राऊत म्हणाले…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमधील गोळीबार मैदानावर सभा झाली. या सभेनंतर आता शिंदेंची सभाही होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेवरून संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं.
संजय राऊत म्हणाले, “ते मुख्यमंत्री आहेत ना, ते स्वतःला मुख्यमंत्री मानतात का? महाराष्ट्र त्यांना मानत नाही. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, ते बघण्यासाठी फिरा. या उत्तर महाराष्ट्रात या. काल मालेगावात येताना मला वाईट वाटलं. मराठवाड्यात, विदर्भात शेतकऱ्यांच्या जीवनात हाहाकार सुरू आहे. सभा कसल्या घेता आमच्याविरोधात? सभा घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे? आम्ही तुम्हाला पूर्णपणे नेस्तनाबूत करू, पराभूत करू. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने का होईना, पण आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात. जोपर्यंत आहात तोपर्यंत शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून त्यांच्यापर्यंत पोहोचा.”
“इतके दिवस आपण समजत होतो मुख्यमंत्री सर्वोच्च”, अजित पवारांनी छेडला राजीनाम्याचा मुद्दा
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
भाजपच्या सोशल मीडियाच प्रमुखांची आणि प्रवक्त्यांची कार्यशाळा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, आपले 150-170 निवडून येतील, पण आपण 240 जागा (विधानसभा निवडणूक) लढण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेंचे पन्नासच… कारण पन्नासच्या वर त्यांच्याकडे कुणी नाहीये. 240 जर लढल्या, तर अशा वेळी तुम्हाला टीम अलर्ट करावी लागेल.”
ADVERTISEMENT