देहू: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (14 जून) तीन कार्यक्रमांनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थित असलेल्या सर्व वारकऱ्यांना संबोधित केलं. ज्यामध्ये त्यांनी वारी पांडुरंगाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच मात्र, त्याशिवाय आपलं सरकार कशा पद्धतीने कारभार करत आहे यावरही भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
जाणून घेऊया पंतप्रधान मोदींच्या देहूमधील भाषणातील 11 महत्त्वाचे मुद्दे:
1. पालखी मार्गाचं काम हे तीन चरणात पूर्ण होईल. 350 किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे यामध्ये तयार केला जाणार आहेत. यावेळी 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार.
2. ज्या शिळेवर तुकाराम महाराांनी सलग 13 दिवस तपस्या केली ती शिळा फक्त शिळा नाही तर ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शिळा आहे. येथे आपण जे पुननिर्माण केलं आहे त्यासाठी आभार व्यक्त करतो.
3. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारत शाश्वत आहे कारण ही संतांची भूमी आहे. प्रत्येक वेळी इथे मार्गदर्शनसाठी सत्परुष जन्माला आले आहेत. यांच्यामुळेच भारत हा आजही गतीशील आहे.
4. आजही देश जेव्हा सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे. त्यावेळी तुकारामांचे आपल्याल अभंग प्रेरणा देतात, दिशा देतात. सर्व संतांच्या अभगांनी एका वेगळीच प्रेरणा मिळते.
5. संत तुकाराम म्हणत उच्च-नीच असा भेदभाव करणं हे पाप आहे. हा उपदेश जेवढा उपयुक्त धर्मासाठी आहे तेवढाच राष्ट्रभक्तीसाठी देखील आहे. हाच संदेश घेऊन वारकरी दरवर्षी वारी करतात. त्यातूनच सरकारच्या योजनांचा लाभ विना भेदभाव सगळ्यांना मिळतो आहे.
6. ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणजे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’, तुकारामांचा हा अभंग आपल्याला हेच सांगतो की, जेव्हा तुम्ही शेवटच्या रांगेत बसलेल्यांचा देखील विकास करायचा. हाच अंत्योदय आहे. समाजातील सर्वात खालच्या स्तरातील सगळ्यांचे कल्याण करणं हाच खरा उद्देश आहे.
7. वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते तुकारामांचे अभंग गात असत. वेगवेगळ्या पिढ्यांना संत तुकारामांचे अभंग हे प्रेरणा देत आल्या आहेत.
8. आता आषाढात पंढरपूर यात्रा सुरु होणार आहे. ही यात्रा आपल्या समाजासाठी गतीशीलतेसारख्या आहेत. एक भारत, एक राष्ट्र यासाठी या यात्रा पूरक ठरतात.
“मोदी म्हणाले अजितदादांना बोलू द्या, पण…” वाचा देहूतल्या कार्यक्रमात स्टेजवर नेमकं काय घडलं?
9. आता अयोध्येत देखील भव्य राम मंदिरही उभं राहत आहे. काशी विश्वनाथाचं स्वरुप बदलण्यात आलं आहे. तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांचा विकास केला जात आहे. रामायण सर्किट, बाळासाहेब आंबेडकर पंचतीर्थ यांचा देखील विकास केला जात आहे.
10. ‘असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे..’, योग्य दिशेने प्रयत्न केले तर अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ शकतील. गरिबांसाठी योजना सरकार राबवते आहे. पर्यावरण, जलसंवर्धन, नद्यांसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ‘स्वस्थ भारत’ हा संकल्प आपल्याला 100 टक्के पूर्ण करायचा आहे.
11. प्लास्टिकमुक्तीचा संकल्प, नदी-तलावे साफ करण्याचा संकल्प केला तर देश स्वच्छ राहिल. तसंच आपण प्राकृतिक शेतीची मोहीम देखील पुढे नेत आहोत. प्राकृतिक शेती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
असे महत्त्वाचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देहूतील भाषणात मांडले आहेत.
ADVERTISEMENT