जॅकलिन फर्नांडीस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यातलं अफेअर, त्याने तिला दिलेली गिफ्ट. त्यांचे काही फोटो हे सगळं व्हायरल होत असतानाच आता सारा अली खानही ईडीच्या रडारवर आहे. कारण खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरने सारा अली खानला गिफ्ट दिल्याचं समोर येतं आहे. चॉकलेट्स आणि काही महागडी घड्याळं दिल्याचं समोर येतं आहे. त्यामुळे अभिनेत्री सारा अली खान ईडीच्या रडारवर आहे.
ADVERTISEMENT
सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यातली जवळीक दाखवणारा ‘हा’ फोटो तुफान व्हायरल
सारा अली खानसोबत मैत्री करण्याच्या उद्देशाने चॉकलेट्स आणि फ्रँक मुलर घड्याळं देण्यात आली होती अशी माहिती इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिली आहे. याआधीच्या तपासात हे समोर आलं होतं की सुकेश चंद्रशेखरने कॅनेडियन वंशाची अभिनेत्री नोरा फतेहीला BMW कार गिफ्ट केली होती. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला त्याने दहा कोटींहून अधिक किंमतीच्या वस्तू भेट दिल्या होत्या. त्यामुळे जॅकलिन आणि त्याचं प्रकरण गाजलं होतंच आता या सोबतच सारा अली खानचंही नाव समोर आलं आहे.
खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरने सारा अली खानला 21 मे 2021 ला Whats App वर सुरज रेड्डी या नावाने मेसेज केला होता. आपण सुरज रेड्डी आहोत अशीच ओळख त्याने करून दिली होती. हे दोघे व्हॉट्स अॅप चॅट करत असताना साराच्या मैत्रीखातर आपण तिला कार गिफ्ट करू इच्छितो असं सुरज अर्थात सुकेश चंद्रशेखरने साराला सांगितलं होतं. सुरज रेड्डी या नावाने तो तिला मेसेज करत होता. आपल्याशी मैत्री कर हा आग्रह तो करत होता.
या प्रकरणी 14 जानेवारी 2022 ला ईडीने सारा अली खानची चौकशी केली होती. त्यावेळी तिने आपण कोणत्याही भेटवस्तू सुकेश उर्फ सुरज रेड्डीकडून स्वीकारल्या नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. सारा अली खानने ईडीला हेदेखील सांगितलं होतं की सुरजला अनेकवेळा मैत्री करण्यासाठी तिने नकार दिला. त्यानंतर अखेर तिने चॉकलेट्सचा बॉक्स घेण्याबाबत सहमती दर्शवली. त्यानंतर सुरज उर्फ सुकेशने तिला फ्रँक मुलर हे घड्याळ पाठवलं. या घड्याळ्याची किंमत भारतात लाखोंच्या घरात आहे. सारा अली खान सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात साक्षीदार होऊ शकते असा विश्वास ईडीला वाटतो आहे.
ADVERTISEMENT