सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात शुक्रवारी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्यानं खळबळ उडाली. अंधश्रद्धा आणि काळ्या जादूमुळे हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
फलटण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितलं की, विडाणी गावाजवळील उसाच्या शेतात महिलेच्या मृतदेहाचे काही भाग आढळले. डोक्याचा काही भाग आणि खालचे अवयव शेताच्या जवळ आढळले, तर धड अजूनही गायब आहे. महिलेच्या शरीराचे अवयव कुजले होते. मृतदेहाची स्थिती पाहता असं दिसतं की काही दिवसांपूर्वीच महिलेची हत्या झाली असावी. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस अनेक दृष्टिकोनातून तपास करत आहेत.
हे ही वाचा >>धक्कादायक... वाल्मिकने खंडणी मागितलेल्या अवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू, रस्त्यावरच सापडला मृतदेह
आजूबाजूच्या ग्रामीण भागात चौकशी केली जात आहे. परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत्यूची वेळ आणि कारण निश्चित करण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा >>Saif Ali Khan वरच्या हल्ल्यात अंडरवर्ल्डचा हात? गृह राज्यमंत्र्यांनी दिलं 'हे' उत्तर
अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्रासारख्या गोष्टीसाठी हा खून झाला असावा ही शंका स्थानिकांनाही आहे. पोलिसांनी सांगितलं की, 'आम्ही प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक केली जाईल.'
ADVERTISEMENT
