Satish Wagh Case : पुण्यातलं सतीश वाघ प्रकरण राज्यभरात चर्चेत आलं. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा काही दिवसांपूर्वी अपहरण करुन खून करण्यात आला. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होत होते. पण पुणे पोलिसांनी अगदी काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लावला आहे. या घटनेत मोहिनीवाघ अर्थातच सतीश वाघ यांच्या पत्नी आणि योगेश टिळेकर यांच्या मामीनेच सतीश वाघ यांचा काटा काढल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर मोहिनी वाघ यांचा रडतानाच एक व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल होतोय.
ADVERTISEMENT
सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांना संपवण्यात आलं. त्यांच्या अपहरणाची आणि खुनाची बातमी समोर आल्यानंतर मोहिनी वाघ धाय मोकलून रडू लागल्या. कुणाला शंका येऊ नये म्हणून मोहिनी वाघ या अगदी काहीच माहिती नसल्यासारखं रडत असल्याचं दिसतंय. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात मोहिनी वाघ यांनी आपल्या पतीला संपवल्याचं समो आलंय. अक्षय जवळकर या तरूणाशी असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये आपले पती सतीश वाघ हे अडसर ठरत असल्यानं ही सुपारी दिल्याचं समोर आलं आहे.
प्रेमप्रकरण ते सुपारी... संपूर्ण घटनाक्रम
सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे अक्षय जवळकर नावाच्या एका तरूणाशी अनैतिक संबंध होते. ज्यामध्ये पती सतीश वाघ हे अडसर ठरत होते. त्यामुळेच 5 लाख रुपयांची सुपारी देऊन सतीश वाघ यांना संपवण्याचा कट मोहिनी वाघ हिने रचला असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ याच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा >> Crime News : आधी पत्नी आणि मुलाल संपवलं, मग आई-वडिलांवर हल्ला केला आणि नंतर... हादरवणारी घटना
मोहिनी वाघ यांनी आपल्या मुलाच्या मित्रासोबतच अनैतिक संबंध ठेवले होते. अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. या काळातच मोहिनी वाघ यांचे आणि अक्षयचे सूत जुळले. पुढे या संबंधांचं प्रेमात रुपांतर झालं आणि इथूनच सुरू झाले मोहिनी आणि अक्षय यांचे अनैतिक संबंध. या सर्व गोष्टींमध्ये सतीश वाघ हे अडसर ठरत होते, त्यामुळे मोहिनी वाघ यांनीच पाच लाख रुपये अक्षयला दिले आणि खून करण्याचं ठरवलं.
अक्षयने याप्रकरणाची सुपारी पवन आणि त्याचे साथीदार नवनाथ आणि विकास यांना दिली. अक्षय जवळकरने काही पैसे आरोपींना दिले तर काही पैसे बाकी होते अशी माहिती आहे.
ADVERTISEMENT
