मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गरोदर माता आणि नवमातांना सर्वाधिक फटका बसल्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अभ्यासात आढळलं आहे. याचा आधार घेत अशा महिलाचं लसीकरण करण्यावर भर देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
या अभ्यासामध्ये कोरोना झालेल्या गरोदर आणि नवमातांच्या मृत्यूंचं विश्लेषण करण्यात आलं आहे. ज्यानुसार गरोदर आणि नावमातांच्या मृत्यूचा दर 5.7 टक्के आहे. पहिल्या लाटेत हा दर 0.75 टक्के होता.
एकूण रुग्णापैकी झालेल्या मृत्यू झालेल्या रुग्ण संख्या याच्या आधारे हा मृत्यू दर काढण्यात आला आहे. तसंच लक्षणं दिसलेल्या रुग्णांचं प्रमाण देखील पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जास्त होतं. पहिल्या लाटेत हे प्रमाण 14.2 टक्के होतं तर दुसऱ्या लाटेत ते दुप्पटीपेक्षा जास्त वाढलं.
दुसऱ्या लाटेत हे प्रमाण 28.7 टक्के इतकं नोंदवण्यात आलं. ही सर्वा माहिती मुंबईतल्या नायर रुग्णालयातून जमविण्यात आली आहे. याच नायर रुग्णालयात पहिल्या लाटेवेळी गरोदर मातांची प्रसूत यशस्वी होत असल्याचं आणि मातांमधून नवजात मुलांना लागण होत नसल्याचं सांगण्यात आलं होतं.
स्तनदा मातांना लस घेता येणार , मुंबईच्या मातांना थेट लस घेता येणार
यासाठी संसर्ग झालेल्या 4000 हजार महिलांच्या माहितीचा आधार घेण्या आला होता. पहिल्या लाटेवेळीचा डाटा हा 1 एप्रिल ते 31 जानेवारीपर्यंतचा घेण्यात आला होता. तर, दुसऱ्या लाटेच्या वेळचा डाटा हा 1 फेब्रुवारी ते 14 मे पर्यंतच्या नोंदणीतून घेतलेला आहे.
या महिलांना उपचार देणाऱ्या डॉक्टरांनीही पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट गरोदर आणि नव मातांसाठी जास्त धोकादायक ठरल्याचं मान्य केलंय.
पहिल्या लाटेवळी गरोदर मातांसाठी ज्या मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या होत्या त्या दुसऱ्या लाटेवळी पूर्णतः बदलण्यात आल्या. पण तरिही उपचारांमध्ये अडथळे येत असल्याचं या नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी या अभ्यासावेळी सांगितलं.
या अभ्यासाची माहिती सर्वांसमोर मांडताना आयसीएमआरने नोंदवलेल्या मतानुसार महामारीला सुरुवात झाल्यापासून झालेल्या मृत्यूंपैकी 2 टक्के मृत्यू हे गरोदर आणि नवमातांचे आहेत. यातले सर्वात जास्त मृत्यू हे कोव्हिडमुळे झालेला न्युमोनिया आणि श्वसनयंत्रणा निकामी होण्यामुळे झाले आहेत.
युद्ध सुरु असताना सैनिकांनी घरात बसून कसं चालेल? गरोदरपणातही महिला डॉक्टर करतेय कोरोना रुग्णांची सेवा
लवकरच हा अभ्यास मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अभ्यासावरुन आयसीएमआरने स्तनदा माता आणि गरोदर महिलांच्या लसीकरणाची सर्वाधिक आवश्यकता असल्याचं मत मांडलं आहे.
गेल्या महिन्यात याबाबत बोलताना केंद्रिय आरोग्य खात्याने गरोदर मातांना लस द्यावी का याबाबत लसीकरणाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं
ADVERTISEMENT