अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या ग्रामीण भागात कलम १४४ लागू

मुंबई तक

• 01:21 PM • 14 Nov 2021

त्रिपुरा येथील मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी दंगल घडल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातले आदेश जाहीर केले आहेत. अमरावती आणि इतर भागांत घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण भागात काही समाजकंटक […]

Mumbaitak
follow google news

त्रिपुरा येथील मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी दंगल घडल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातले आदेश जाहीर केले आहेत.

हे वाचलं का?

अमरावती आणि इतर भागांत घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण भागात काही समाजकंटक इंस्टाग्राम, व्हॉटसअप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे दोन समाजामध्ये, गटामध्ये तेढ निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोणावळा : तन्वी बंगल्यात सुरू होती अश्लिल डान्स पार्टी! पहाटेच पडली धाड, 9 पुरुष व 8 महिलांना अटक

१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत पुणे ग्रामीण भागात १४४ कलमाअंतर्गत खालील गोष्टी करण्यात मनाई करण्यात आली आहे.

१. कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसअप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे जातीय तणाव निर्माण करणान्या गोष्टी पसरविणे.

२. कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसअप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणे/ शेअर करणे. अशा कृत्य केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रुप अडमिनची राहील,

३. समाज माध्यमांमध्ये चुकीची माहीती/ अफवा जाणीवपूर्वक प्रसारीत करणे.

४. पाच व पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे. सभा घेणे तसेच शस्त्र लाठी, काठी बाळगणे.

५. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्स बोर्ड लावणे व त्या प्रकारच्या घोषणा देणे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम 188 प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील.

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. ज्यात सरकारी मालमत्तेसह पोलिसांच्या गाड्यांची आंदोलनकर्त्यांनी तोडफोड केली होती. अमरावती शहरात प्रशासनाने संचारबंदी लागू केली असून तिकडे सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

निर्जन रस्ते, भयाण शांतता…पाहा दंगलीनंतरच अमरावती शहर

    follow whatsapp