ADVERTISEMENT
धावपटू आणि अॅथलिट मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांचं कोरोनामुळे निधन झालं
मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी पंजाबच्या गोविंदपुरामध्ये झाला
1958 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि 400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले.
1962 मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर आणि 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.
1959 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाच दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांच्या पत्नीचंही कोरोनामुळे निधन झालं
मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे
आता उरल्या आहेत त्या फक्त मिल्खा सिंग यांच्या आठवणी..
ADVERTISEMENT