Pankaja Munde: ‘राजकारणाची वाट काटेरी, पण..’, असं का म्हणाल्या पंकजा मुंडे?

मुंबई तक

04 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:06 AM)

Pankaja Munde on Politics: बीड: ‘राष्ट्रसंत भगवान बाबांनी त्याकाळी महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून खऱ्या अर्थाने आरक्षण दिलं. संत मीराबाई यांचे आशीर्वाद व महंत राधाताई महाराज यांची गेल्या पंचवीस वर्षापासूनची कठोर साधना याचा परिपाक म्हणून हे संस्थान महिलांची पंढरी झाली आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात मला अनेक चांगली कामं करता आली, ते माझं कर्तव्यच होतं तथापि जनसामान्याचं […]

Mumbaitak
follow google news

Pankaja Munde on Politics: बीड: ‘राष्ट्रसंत भगवान बाबांनी त्याकाळी महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून खऱ्या अर्थाने आरक्षण दिलं. संत मीराबाई यांचे आशीर्वाद व महंत राधाताई महाराज यांची गेल्या पंचवीस वर्षापासूनची कठोर साधना याचा परिपाक म्हणून हे संस्थान महिलांची पंढरी झाली आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात मला अनेक चांगली कामं करता आली, ते माझं कर्तव्यच होतं तथापि जनसामान्याचं मिळत असलेलं प्रेम हिच माझी खरी ताकद आहे.’ असे भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज येथे सांगितले. (see what exactly pankaja munde had to say about politics and ministership)

हे वाचलं का?

महासांगवी येथे सिद्धसंत मीराबाई आईसाहेब यांच्या २५व्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित स्त्री शक्तीचा जागर महिला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘महंत राधाताई महाराज यांनी अत्यंत कमी वयात या गादीचा वारसा सक्षमपणे पुढे नेला आहे कोणत्याही गादीचा वारसा चालवणे हे सोपे नाही. आज महिला आरक्षणाचा लढा आपण लढतोय पण त्याकाळात संत भगवान बाबांनी खऱ्या अर्थाने महिलांना आरक्षण दिले. कारण ते एक वैभवशाली परंपरेचे संत होते.’

‘आमचं तर रक्ताचं नातं’, पंकजा मुंडेंनी धनंजय मुडेंना काय दिला सल्ला?

राजकारणाबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘राजकारणाची वाट ही तशी काटेरी आहे. ज्यावेळी मी राजकारणात नवीन होते त्यावेळी मुंडे साहेब माउलीच्या मायेने माझी विचारपूस करून काळजी घेत असत.’ असं म्हणत पंकजा मुंडे यावेळी काहीशा भावूक झाल्या होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, ‘आपल्या कार्यकाळात मला अनेक चांगली कामे करता आली, ते माझं कर्तव्यच होतं. मुंडे साहेबांइतकच लोकांचं प्रेम मला मिळत गेलं. या प्रेमापेक्षा मोठी संपत्ती नाही. आपल्याशी नातं जपणं हे मला मंत्रिपदापेक्षा अधिक महत्वाचं वाटतं. हे संस्थान म्हणजे निश्चितच महिलांची पंढरीच असून या संस्थानशी व महंत राधाताई महाराज यांच्याशी असलेले ऋणानुबंध हे चिरकाल कायम राहतील.’ असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

‘मोदींनीही ठरवलं तरी मला संपवू शकणार नाही’; ‘घराणेशाही’वरून पंकजा मुंडेंचं विधान

कर्मयोगिनी पुरस्कारानं गौरव

यावर्षी संस्थानकडून प्रथमच पंकजा मुंडे यांचा संत मीराबाई कर्मयोगिनी पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आ. सुरेश धस , आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. भीमराव धोंडे , माजी जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार , डॉ.सारिका क्षीरसागर , हभप रामकृष्ण रंधवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजपा नेते मधुकर गर्जे सरपंच चैत्राली सानप यांच्यासह मान्यवरांची व हजारो भाविक महिला व नागरिकांची उपस्थितीही होती.

    follow whatsapp