गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे अनेकजण सध्या गुंतवणुक करण्यासाठी सुरक्षित पर्यायाच्या शोधात आहेत. त्यामुळेच एका खास योजनेबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतो. तुमच्या फायद्याची ही योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). निवृत्तीनंतर सुरक्षित आणि स्थिर उत्पन्नाचं नियोजन करण्यासाठी ही योजना सर्वोत्तम गुंतवणूकींपैकी ठरते आहे.
ADVERTISEMENT
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) सेवानिवृत्त लोकांना निश्चित परतावा देते. तसंच, तुम्ही या योजनेत कोणत्याही जोखीमेशिवाय गुंतवणूक करू शकता. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या लहान बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याज या योजनेत मिळतं. यामुळे बचत आणि गुंतवणूक अशा दोन्हीही गोष्ट साध्य करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही योजना एक उत्तम पर्याय आहे.
किती व्याज मिळेल?
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत, 8.2 टक्के वार्षिक व्याज दिलं जातं. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा निवृत्ती निधी सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच स्थिर उत्पन्न मिळविण्यासाठी ही एक फायदेशीर योजना आहे.
हे ही वाचा >> Amit Shah : "शरद पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम...", अमित शाहांचं विरोधकांवर शरसंधान
योजनेची वैशिष्ट्य काय?
भरगोस परतावा: ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2 टक्के वार्षिक व्याजदर देते. त्यामुळे ती सुकन्या समृद्धी योजनेसह सर्वाधिक व्याज देणारी लघु बचत योजना ठरते.
टॅक्स बेनिफिट : तुमच्या ठेवी आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत टॅक्स प्रॉफिटसाठी पात्र ठरते. त्यामुळे खातेधारकांची अतिरिक्त बचत होते.
सुरक्षा: या सरकारी योजनेत तुमच्या ठेवी 100 टक्के सुरक्षित असतात.
हे ही वाचा >> Thane Crime News : पाणी पिण्यासाठी बसमधून खाली उतरला प्रवासी, चोरट्यांनी लांबवली 2 कोटीचे दागिने असलेली बॅग
उदाहरणार्थ ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास किती दिवसात कसा नफा होईल?
तिमाही व्याज: ₹ 60,150
वार्षिक व्याज: ₹ 2,40,600
पाच वर्षांचे एकूण व्याज: ₹ 12,03,000
एकूण मॅच्युरिटी रक्कम: ₹42,03,000
त्यामुळेच ज्यांना निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न आणि आर्थिक सुरक्षितता हवी आहे त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक चांगला पर्याय आहे.
ADVERTISEMENT
