Sanjay Raut Controversy : कोल्हापुरात विधिमंडळाबद्दल अपशब्द काढल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी साताऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त करताना अर्वाच्च शब्द वापरले. त्यांच्या या भाषेमुळे सध्या वादात सापडले असून, आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी राऊतांना लक्ष्य करताना उद्धव ठाकरेंना राजकीय सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना आव्हान देताना त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी आपण मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांची (देवेंद्र फडणवीस)भेट घेणार अशल्याचं सांगितलं.
उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं. ‘आमच्यामुळे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनाम द्यावा’, अशा शब्दात देसाईंनी राऊतांना डिवचलं.
‘हेम्या, तू शेण खायला…’, खासदार संजय जाधवांचं हेमंत पाटलांवर टीकास्त्र
शंभूराज देसाई म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल वापरलेली शिवराळ भाषा आणि विधनसभेतीत सदस्यांना उद्देशून चोरमंडळ असा केलेला उल्लेख याचे पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. जनतेमधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे.”
देसाईंनी पुढे बोलताना सांगितलं की, “त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल विधिमंडळाने घेतली असून, त्यांच्यावर हक्कभंग कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी विशेष हक्क समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली असून, शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत त्यांना म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी नोटिशीला उत्तर दिलेले नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लवकरच भेटणार आहोत.”
शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ काय.. तुम्हाला वाटतं 2024 मध्ये सत्ताबदल होईल?
खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि… देसाईंनी दिलं आव्हान
शंभूराज देसाई म्हणाले, “खासदार संजय राऊत वाचाळ बडबड करत आहेत. सातारा येथे ज्या हॉलमध्ये त्यांची सभा झाली, त्या हॉलची क्षमता तीनशे ते चारशे लोकांची होती. त्याहून अधिक लोक आमच्याभोवती जमतात.”
“आमच्या मंत्रिपदावर हरकत घेणारे आणि आम्हाला चोर म्हणणारे संजय राऊत आमच्या मेहरबानीवर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे. त्यांच्यामुळेच चाळीस आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आहेत. ठाकरे यांनी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले पाहिजे”, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
ADVERTISEMENT