बाप आणि मुलीचं नातं हे अत्यंत पवित्र मानलं जातं. परंतू याच नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पंढरपूर शहरात घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर शारिरिक अत्याचार केल्याचं उघड झालंय. इतकच नव्हे तर आपल्यापासून मुलीला दिवस गेल्याचं लक्षात येताच या बापाने मुलीचं आपल्याच समाजातील एका तरुणाशी लग्न लावून दिलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी पीडित मुलीच्या आईचं निधन झालं. यानंतर मुलगी ही आपल्या बाबांसोबत राहत होती. यावेळी नराधम बापाने नात्याच्या सर्व मर्यादा ओलांडून आपल्याच मुलीवर शारिरिक अत्याचार केले. यावेळी मुलगी गरोदर राहिल्याचं लक्षात येताच त्याने आपल्याच समाजातील एका तरुणाशी तिचं लग्न लावून दिलं.
आजार बरा करण्यासाठी महिलेकडे शारिरिक संबंधाची मागणी, गुप्तांगाचे फोटो पाठवणारा भोंदूबाबा अटकेत
लग्नानंतर पतीनेही या पीडितेवर शारिरिक अत्याचार केले. परंतू आपल्या पत्नीच्या गर्भवती अवस्थेबद्दल कळल्यानंतर पतीने तिला पुन्हा वडिलांच्या घरी येऊन सोडलं. पंढरपुरातील एका रुग्णालयात या मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. पंढरपूर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपी बाप आणि पतीला अटक केली आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकारामुळे पंढरपुरात संताप व्यक्त केला जात आहे.
पंढरपुरात पोलिसांनी रोखले दोन बाल विवाह
ADVERTISEMENT