NCP chief Sharad Pawar big statement on early morning swearing-in: पुणे: महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) हे 2019 विधानसभा निवडणूक निकालानंतर पूर्णपणे बदलून गेलं. त्यातही भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणंच बदलली. आता या घटनेला तीन वर्ष उलटून गेलेली असतानाही त्यातील गूढ अद्यापही कायम आहे. कारण याबाबत अनेक नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. असं असताना आता स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत पुण्यातील पत्रकार परिषेदत एक मोठं वक्तव्य केलं आहे. (then thackeray would not have become the chief minister sharad pawar himself blasted about early morning swearing in)
ADVERTISEMENT
‘पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती उठली. मी सरळ सांगितलं की, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? त्यामुळे मी जे सांगितलं.. ते समजणाऱ्यांना समजतं.’ असं म्हणत शरद पवारांनी आता पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!
पहाटेच्या शपधविधीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य:
स्वत: शरद पवार हे पुणे आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. पुण्यात आज त्यांची एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
पवार म्हणाले, ‘2019 मध्ये सरकार बनविण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की, राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय झालं हे तुम्ही पाहिलं असेल.’
‘असं आहे की, याविषयी बोलायची आवश्यकता काय? काही गोष्टी या समजणाऱ्यांना समजतात. आता मी सरळ सांगितलं की, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?’
‘राष्ट्रपती राजवट काढावी असं नाही.. तर निघाली. असं आहे की, महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. मध्यंतरी एका गृहस्थाने सांगितलं की, महाराष्ट्रात काही झालं तरी एका व्यक्तीचं नाव घेतलं जातं. तेव्हा त्यांनी उदाहरण दिलं की, लातूरला भूकंप झाला त्याचंही कारण अबक… ही व्यक्ती होती. त्यामुळे ठीक आहे. त्यामुळे मी जे सांगितलं.. ते समजणाऱ्यांना समजतं.’ असं वक्तव्य शरद पवार यावेळी केलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता-शरद पवार
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘माझ्यासोबत विश्वासघात दोन वेळा झाला. पहिला उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी आधी आमच्यासोबत निवडणुका लढविल्या, आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे म्हणतं होते. तेव्हा तेही टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी आकडे लक्षात आले त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी विश्वासघात केला.’
पुढे ते म्हणाले, ‘दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा करत होते, त्यांची चर्चा पुढे जात होती. पण त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, आपण सरकार तयार करुया.’
‘राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवार यांच्याशीच चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या होत्या. पण त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पण पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण तो आपल्याच व्यक्तीने केला होता.’ असं देवेंद्र फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.
ADVERTISEMENT