महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन दोन दिवसच घेतलं जाणार आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी असा आरोप केला की मी गौप्यस्फोट करणार आहे हे या सरकारला ठाऊक आहे म्हणून हे सरकार आंदोलनापासून पळ काढतं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपावरून शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
‘देवेंद्र फडणवीस यांना जे काही गौप्यस्फोट करायचे आहेत ते त्यांनी खुशाल करावेत. महाराष्ट्रात मीडिया अजून शिल्लक आहे. त्यांच्या माध्यमातून काय गौप्यस्फोट करायचे आहेत ते करा. त्यासाठी राज्याला वेठीला धरू नका. राज्यात कोरोनाची स्थिती आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला आहे. केंद्राने जे संसदेच्या अधिवेशनाबाबत केलं ती परिस्थितीही लक्षात घ्या’ असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे.
OBC समाजात प्रचंड रोष, भाजप 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार-पंकजा मुंडे
दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरी राष्ट्रीय मंचाची बैठक पार पडली त्याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की ‘सध्याच्या सरकारचा म्हणजेच मोदी सरकारचा विरोध करायचा म्हणून आम्ही बैठक घेतली नव्हती. देशात सक्षम पर्याय हवा असेल तर काय करावं लागेल याबाबत आम्ही चर्चा केली. मात्र काँग्रेसला सोबत घेऊनच लढावं लागेल हा विचार मी बैठकीतही मांडला आणि माझंही तेच मत आहे.’ सामुदायिक नेतृत्व घेऊनच लढावं लागेल, सध्याच्या सरकारला पर्याय द्यावा अशी जनतेची भावना आहे आणि ती आमची जबाबदारी आहे मात्र मीच नेतृत्व करेन असं काही नाही, मी मागे बरेच उद्योग केलेत. विरोधी पक्षांची एकजूट करणं ,मोट बांधणे अशी काम करत असतो असंही ते म्हणाले.
केंद्रीय यंत्रणांच्या नैराश्यातून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई, आम्हाला चिंता नाही-शरद पवार
OBC आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन होणार आहे त्याबाबत विचारलं असता शरद पवारांनी भाजपला पुन्हा एकदा टोला लगावला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे सांगत आहेत की आंदोलन करू नका, आंदोलनांपासून लांब राहा आणि राज्यातले त्यांचेच भक्त आंदोलन करणार आहेत’
अनिल देशमुख यांच्यावर जी ईडीने कारवाई केली त्यावरही त्यांनी पुण्यात भाष्य केलं. अनिल देशमुख यांच्यावर जी कारवाई झाली ती केंद्रीय यंत्रणांच्या नैराश्यातून झाली. आम्हाला अशा गोष्टींची आता सवय झाली आहे. मुळीच चिंता वाटत नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT