‘आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे’, मत मांडत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला वस्तुस्थिती स्वीकारण्याचा सल्ला दिला. पवारांच्या या सल्ल्यावर आता काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी भाष्य केलं आहे. ते ‘आजतक’शी बोलत होते.
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय व राज्यातील राजकारणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यात काँग्रेसलाही वस्तुस्थिती स्वीकारण्याबद्दल आत्मपरिक्षण करण्याविषयी पवार बोलले.
शरद पवार यांनी मांडलेल्या मतांवर बोलताना काँग्रेस नेते तारिक अन्वर म्हणाले, ‘शरद पवार मोठे नेते आहेत. काँग्रेससोबत त्यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे त्यावर जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. काँग्रेसची आजच्यासारखी परिस्थिती यापूर्वीही अनेकवेळा झालेली आहे. राजकीय पक्षांच्या वाटचालीत अशी परिस्थिती नेहमीच निर्माण होत असते’, असं मत अन्वर यांनी मांडलं.
Video : ‘Modi सरकारने EDचा कितीही गैरवापर केला तरीही महाराष्ट्रातलं सरकार भक्कम’
‘भाजपचे कधीकाळी केवळ दोन खासदार होते. काँग्रेस एक विचारधारा घेऊन वाटचाल करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे चढउतार येतच राहतात. यामुळे काँग्रेस पक्ष घाबरून जाणार नाही. एक उद्दिष्टसमोर ठेवून ही लढाई सुरू आहे. आज भाजपने देशासमोर जी आव्हान निर्माण करून ठेवली आहेत, त्यासाठी हे आवश्यक आहे की, आम्ही आमचा वापर करणं’, असंही तारिक अन्वर म्हणाले.
‘आमचे जे सहकारी आणि समविचारधारेचे लोक आहेत. त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचाच आमचा प्रयत्न आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या मतांवर कोणत्याही प्रकारची टिप्पणी करणं योग्य नाही. पण देशात सध्या दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. एक काँग्रेस व दुसरी भाजप आणि काँग्रेस पक्षाशिवाय कोणत्याही पर्यायाचा शोध घेणं निरुपयोगी आहे’, असं मत तारिक अन्वर यांनी यावेळी मांडलं.
Congress ने अनेकांना जमीन राखायला दिली, काहींनी डाका घातला नाना पटोलेंचं पवारांना उत्तर
शरद पवारांनी काँग्रेसबद्दल काय भाष्य केलेलं?
‘मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली आहे. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आली आहे. सकाळी जमीनदार उठतो आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.’
पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘तसं काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती; आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग (विरोधी पक्ष) जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल’, असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेसला दिला आहे.
ADVERTISEMENT