बंडखोरीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बोलणं टाळणारे एकनाथ शिंदे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य करताना दिसताहेत. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात ठाकरेंची कोंडी करणाऱ्या एकनाथ शिंदेंना आता शिवसेनेची सूत्रं हाती घ्यायची तर नाहीत, ना असं ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीतल्या उत्तरांचा रोखातून दिसून येतंय. इतकंच नाही, तर भविष्यात एकत्र येण्याबद्दलही नकारात्मक असल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पक्षप्रमुखाबद्दल (उद्धव ठाकरे) काय म्हणाले?
‘शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण असतील?’, असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पक्ष प्रमुखपद जाऊ द्या. शिवसेना वाढली पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे. सर्वांच्या मेहनत व ताकदीतून ती झाली आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकतो का? बाळासाहेबांनी कायम काँग्रेस व राष्ट्रवादीला विरोध केला. त्या विचारांपासून आम्ही फारकत घेतली. दाऊदचे हस्तक असलेल्या मंत्र्याच्या विरोधात आम्ही काहीच कारवाई करू शकलो नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत”, उत्तर शिंदेंनी दिलं.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला, ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा
एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यनेते
या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख पद जाऊ द्या असं एका वाक्यात उत्तर दिलं असलं, तरी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदेंनी मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये एक बैठक घेतली होती. याच बैठकीत शिवसेनेचे मुख्यनेता असं पद तयार करून एकनाथ शिंदेंना पक्षाचे सर्व अधिकार देण्यात आले. शिवसेनेची सूत्रं हाती घेण्याच्या दृष्टीने शिंदेंकडून हे पहिलं पाऊल टाकण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर मुख्यनेता म्हणून निवड झाल्यानंतर शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेनेच्या कार्यकारिणीत सुधारणा करण्यास सांगितलेलं आहे. ती सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे लांबणीवर पडलेली आहे.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचे मोबाईल टॅप केले जायचे?; मुख्यमंत्र्यांचा नवा गौप्यस्फोट
यालाच जोडून एक प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. ‘नव्या शिवसेनेत बाळासाहेबांच्या दुसऱ्या (उद्धव ठाकरे) व तिसऱ्या (आदित्य ठाकरे) पिढीचं स्थान काय असेल?’, या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मात्र आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे काही जणांची अडचण झालीये. आमची भूमिका स्वच्छ आहे. ती म्हणजे बाळासाहेबांचे विचार पुढे गेले पाहिजेत”, अशी भूमिका शिंदेंनी यावर मांडली.
“तानाजी सावंत राजकारणातील सूर्याजी पिसाळ, दारु पिऊन…”; युवा सेनेचा नेता आरोग्यमंत्र्यांवर भडकला
भविष्यात शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याबद्दल एकनात शिंदे काय म्हणाले?
भविष्यात एकत्र येण्याबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले, “भविष्याचं काय सांगता येत नाही. सध्या चाललं आहे, ते तर आपण बघता आहातच”, असं उत्तर देत शिंदेंनी अधिकच बोलणं टाळलं.
ADVERTISEMENT