शिंदे गटाने शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय नेलं टेंभी नाक्यावर; काय आहे प्रकरण?

मुंबई तक

• 05:17 AM • 28 Aug 2022

४० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी बंड करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला झटका दिला. आमदारांच्या पाठबळावर भाजपशी हातमिळवणी करत शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त करत थेट केद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं. आता शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका दिलाय. आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणाऱ्या शिंदेंनी शिवसेना […]

Mumbaitak
follow google news

४० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी बंड करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला झटका दिला. आमदारांच्या पाठबळावर भाजपशी हातमिळवणी करत शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त करत थेट केद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं. आता शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका दिलाय. आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणाऱ्या शिंदेंनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदललाय.

हे वाचलं का?

शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून एकनाथ शिंदेंची शिवसेना मुख्यनेता म्हणून निवड केली. इतकंच नाही, तर त्यानंतर प्रतिशिवसेना भवन उभारण्याचं विधानही शिंदे गटाकडून करण्यात आलं होतं. या चर्चा शांत होत नाही, तेच आता शिंदेंनी शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलून टाकलाय.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात हलवलं?

शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय दादरमधील शिवसेना भवनात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या सचिवांकडून केल्या जाणाऱ्या नियुक्त्यांच्या पत्रावरही हाच पत्ता असतो. मात्र, शिंदे गटाच्या पत्रावर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं ठिकाणचं बदलण्यात आलंय. शिवसेना मुख्यनेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या नियुक्तीच्या पत्रावर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता दादर नव्हे, तर ठाण्यातील देण्यात आलाय. त्यामुळे शिंदे गटाकडून मध्यवर्ती कार्यालय ठाण्यात नेण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झालीये.

शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्लान काय? जयंत पाटील यांनी उघड सांगितला

शिंदे गटाचं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पत्ता नेमका काय आहे?

शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय दादरमधील राम गणेश गडकरी चौकातील शिवसेना भवनात आहे. शिवसेनेकडून काढण्यात येणाऱ्या निवेदनावर आणि नियुक्ती पत्रांवर हाच पत्ता आहे. बंडखोरी झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेत विविध पदांवर असलेल्या शिंदे गटातील नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली जात आहे. तर शिंदे गटाकडून त्यांची शिवसेनेचे पदाधिकारी म्हणूनच नियुक्ती केली जात असल्याचं सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रांवर शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय दादरमध्ये नव्हे, तर ठाण्यातील टेंभीनाक्यावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘आनंदआश्रम, श्री भवानी चौक, टेंभी नाका ठाणे पश्चिम’ असा पत्ता शिंदे गटाच्या पत्रावर आहे.

CM Eknath Shinde : “ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा हे आनंद दिघेंचं स्वप्न होतं”

शिंदे गटाने शिवसेनेच्या कार्यकारिणीत केले आहेत बदल

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने ट्रायडंटमध्ये घेतलेल्या बैठकीत नवी कार्यकारिणी निवडली होती. या बैठकीला ४० आमदारांसह १२ खासदारही उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदेंना शिवसेना मुख्यनेता म्हणून निवडण्यात आलं होतं. शिंदे गटाने शिवसेनेच्या कार्यकारिणीत बदल करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र दिलेलं आहे. निवडणूक आयोगातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे लांबलेली आहे.

    follow whatsapp