मुंबईत आणि महाराष्ट्रात चर्चा आहे, ती दसरा मेळाव्याची. पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होताहेत आणि त्यामुळेच राज्यातलं राजकारण तापलं आहे. गर्दी जमवण्यासाठी, शक्ती प्रदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दोघांनी प्रतिष्ठा पणाला लावलीये. आता शिंदे गटाने दसरा मेळाव्याची निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली असून, पत्रिकेतून उपस्थित राहण्याचं भावनिक आवाहन करण्यात आलंय.
ADVERTISEMENT
आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करणाऱ्या शिंदे गटाचा बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा होतोय. त्यासाठी जोरदार तयारीही सुरूये. महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आणण्याचं नियोजन शिंदे गटाचं असून, आता अनेक महत्त्वाच्या मान्यवरांनाही निमंत्रण दिली जात आहेत.
दसरा मेळावा 2022 : उद्धव ठाकरेंचं सगळं प्लानिंग ठरलं! शाखाप्रमुख, नेत्यांकडे मोठी जबाबदारी
शिंदे गट दसरा मेळावा २०२२ : एकनाथ शिंदेंनी निमंत्रण पत्रिकेत काय म्हटलंय?
गर्व से कहो, हम हिंदू है
महोदय/महोदया, सस्नेह जय महाराष्ट्र !
महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई भवानी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना मानाचा मुजरा.
हिंदुस्थानाच्या जाज्वल्य परंपरांचा प्रत्येक भारतीयास अभिमान आहेच. तसाच महाराष्ट्रातील एका परंपरेचा देखील प्रत्येक मराठी मनास अभिमान आहे. ती परंपरा म्हणजे
शिवसेनेचा दसरा मेळावा हिंदुहृदयसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी ह्या परंपरेची रुजवात केली. गेली अनेक दशके देशाला पोखरून काढणारी स्वार्थी प्रवृत्ती उपटून टाकण्याची खरी सुरुवात ह्या मेळाव्यातून झाली. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ह्यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार हीच परंपरा मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांचा मेळावा ह्या वर्षी बीकेसी मैदान बांद्रा मुंबई येथे संपन्न होणार आहे. विचारांचे सोने लुटण्याची ही परंपरा त्यांचे सर्व एकलव्य समान शिष्य ‘विचारांचे वारसदार’ म्हणून पुढे नेणार आहेत. हिंदवी तोफ बंधमुक्त होऊन पुन्हा धडाडणार आहे. आपणही ह्या स्वाभिमानी सोहळ्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती. जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम! कळावे.
आपला,
एकनाथ संभाजी शिंदे
मुख्य नेता, शिवसेना
ADVERTISEMENT