शिर्डी : साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

मुंबई तक

• 03:48 AM • 22 Sep 2021

साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे साईबाबा मंदिरात उपस्थित असलेली चित्रफीत सोशल मीडियात व्हायरल केल्या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी कालरात्री (२१ सप्टेंबर) उशिरा सहा आरोपींना अटक केली. साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी राजेंद्र जगताप, cctv विभागप्रमुख विनोद कोते, संस्थानचे दोन कर्मचारी व इतर दोन आरोपींविरोधात एकूण 13 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Mumbaitak
follow google news

साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे साईबाबा मंदिरात उपस्थित असलेली चित्रफीत सोशल मीडियात व्हायरल केल्या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी कालरात्री (२१ सप्टेंबर) उशिरा सहा आरोपींना अटक केली.

हे वाचलं का?

साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी राजेंद्र जगताप, cctv विभागप्रमुख विनोद कोते, संस्थानचे दोन कर्मचारी व इतर दोन आरोपींविरोधात एकूण 13 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

31 जुलै 2021 रोजी व्यवस्थापन समितीची बैठक आटोपल्यानंतर तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, समिती सदस्य, सहधर्मदाय आयुक्त कार्यालयीन पाहणी करण्यासाठी साईबाबा मंदिरात गेले असता, त्यांचे फोटो व्हिडीओ काढून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले. COVID 19 काळात साईबाबा मंदिर बंद असताना सर्वसामान्यांना साई दर्शन बंद असताना हे साई दर्शन घेणारे कोण? अशा आशयाच्या बातम्या हेतुपुरस्पर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

याबाबत RTI कार्यकर्ते संजय काळे यांनी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार केली होती व याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची लेखी मागणी काळे यांनी केलेली होती.

कटकारस्थान करून बदनामीकारक मजकुराची बातमी प्रसारित करणे, संगनमताने CCTV फुटेज व फोटो विनापरवाना प्रसारित करणे, कॉम्प्युटरमधील डेटाशी छेडछाड करणे, CCTV विभागप्रमुखाने सहआरोपीना मदत करणे असे आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

साईबाबा मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने जबाबदार असलेले प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, CCTV विभागप्रमुख विनोद कोते, चेतक साबळे, अजित जगतापसह सोशल माध्यमात प्रसारित करणारे राहुल फुंदे, सचिन गव्हाणे यांच्या विरोधात साईबाबा मंदिर सुरक्षा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीनुसार IPC 501, 408, 465, 469,34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम , 66,(B), R/W2(1), 66R/W, 43 (A&B) 43G, 84B सह शासकीय गुपिते नियम 1923 कलम 5D नुसार उपरोक्त 6 आरोपीवर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp