आषाढीच्या पायी वारी सोहळ्याला परवानगी न दिल्यानेच कोरोना वाढतो आहे असं वक्तव्य आता शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं आहे. या वारीला संमती द्या देशातला काय जगातला कोरोना नामशेष होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. यासंबंधी संभाजी भिडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे. पंढरपूरच्या आषाढी एकादशीला जी पायी वारी वारकरी करतात त्या वारीला संमती दिली पाहिजे. पायी वारीला संमती दिली तर कोरोना जाईल असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे. या मागणीसाठी संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते या सगळ्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
ADVERTISEMENT
पंढरीची वारी झाल्यानंतर कोरोना नामशेष होईल असं वक्तव्यही संभाजी भिडे यांनी केलं आहे. वारी झाली तर देशातला नाही सगळ्या जगातला कोरोना आटोक्यात येईल असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. संतांच्या परंपरा आल्या की सगळी विघ्नं नाहिशी होतात त्यामुळे पायी वारीला संमती दिली पाहिजे असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. मानाच्या पालख्यांनी वाहनांमधून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्याच्या उपस्थितीत पायी वारी केली पाहिजे अशीही मागणी भिडे गुरूजींनी केली आहे. दारूच्या दुकानात जाणाऱ्या तरूणांना पोलीस अडवत नाहीत. विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड केला जातो असंही भिडे गुरूजींनी म्हटलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनात संभाजी भिडे यांनी काय म्हटलं आहे?
पायी वारी करणारे लाखो वारकरी आहे. गेल्या अनेक वर्षांची वारीची परंपरा आपल्या राज्याला आहे. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशी वारी लाखो वारकरी पायी करतात. वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू होती पण गेल्या वर्षी ती खंडीत झाली. या वर्षी वारी होईल यासाठी वारकरी उत्सुक होते. सद्यस्थितीत राज्यातले काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी झालेला दिसतो आहे.
राज्यात इतर सगळे राजकीय कार्यक्रम सुरू आहेत. वारकऱ्यांनी सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन करून वारीमध्ये सहभागी होऊ असं मान्य केलं होतं. मात्र असं असूनही चर्चेचं निमित्त करून केवळ शंभर जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असं आस्वासन देण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती ही आहे की 100 जणांची वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचं निश्चित केलं. सरकारने वारकऱ्यांचा हा विश्वासघात केला आहे.
ADVERTISEMENT