उदय सामंत हल्ला : शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेंसह 5 जणांना अटक, रत्नागिरीत झळकले बॅनर

मुंबई तक

• 03:52 AM • 03 Aug 2022

माजी मंत्री आणि बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद रत्नागिरीत उमटले असून, हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर्स ठिकठिकाणी झळकले आहेत. माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला […]

Mumbaitak
follow google news

माजी मंत्री आणि बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद रत्नागिरीत उमटले असून, हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर्स ठिकठिकाणी झळकले आहेत.

हे वाचलं का?

माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न पुण्यात झाला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली असून, सोमवारी ते कात्रजमध्ये होते. आदित्य ठाकरेंची सभा पार पडल्यानंतर शिवसैनिक माघारी जात होते. त्यावेळी उदय सामंतांची गाडी त्यांना दिसली.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत, गाडीची काच देखील फोडली. या हल्ल्यामध्ये गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर उदय सामंत यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केलं होतं.

उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाच्या बॅनर्सवर काय लिहिलंय?

आमदार उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच रत्नागिरीतही उमटले आहेत. या हल्ल्याच्या निषेधाचे बॅनर रत्नागिरीत लागले आहेत. विशेष म्हणजे साळवी स्टॉप येथील शिवसेनेच्या शाखेपासून काही अंतरावर हे निषेधाचे बॅनर लागले आहेत.

‘आमदार उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध, विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते. असे हल्ले करणारे हे भ्याडच’, अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर आहे. तसेच या हल्ल्याचा निषेधही सामंत यांच्या समर्थकांकडून करण्यात येणार आहे.

उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांचा हल्ला, ठाकरे विरूद्ध शिंदे गट संघर्ष शिगेला

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला प्रकरणात संजय मोरेंसह ५ शिवसैनिकांना अटक

पुण्यातील कात्रज चौक येथे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात गाडीचं नुकसान झालं आहे. दरम्यान, उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला.

शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंखे, विशाल धनवडे, अनिकेत घुले, रुपेश पवार, शेहबाज पंजाबी यांच्यावर गुन्हा दाखल करणयात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात आता पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह ५ शिवसैनिकांना अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली असून, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. शिवसैनिकांकडून झालेल्या या हल्ल्यानंतर शिवसैनिक आक्रमक होत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

    follow whatsapp