खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवरून माघार घेतली आहे. दरम्यान, आता राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस राणांच्या घरी पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
राणा दाम्पत्याने माघार घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलीस नवनीत राणा आणि रवि राणा यांना ताब्यात घेण्यासाठी खार येथील घरात गेले आहेत.
पोलिसांना नवनीत राणा आणि रवि राणा यांनी वॉरंटची विचारणा केली आहे. त्यावरून आता राणा दाम्पत्य पोलिसांना विरोध करताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT