मुंबई: शिवसेनेला कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीचा दसरा मेळावा ऑनलाइन घ्यावा लागला होता. मात्र, यंदा कोरोनाचे सगळे नियम पाळून हा दसरा मेळावा माटुंग्यातील षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्यात येत आहे. या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
-
आता ही वेळ आली आहे. ती तयारी महाराष्ट्रात असली पाहिजे.
-
फक्त एकच काम करायचं. हिंदुत्वाला आता खरा धोका आहे. जे हिंदुत्वाच्या आधारे वर पोहचले आहेत ते आता इंग्रजांची नीती वापरु शकतात. फोडा, झोडा आणि सत्ता राबवा..
-
मुंबईत मराठी भाषा भवन उभं करत आहोत
-
तसंच चौपाटीवर नाट्य दालन करत आहोत.
-
संभाजीनगरला संतपीठ उभं करतो आहोत
-
धारावीत जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र उभं करणार आहोत, यासारखी कामं आपण करतो आहोत.
-
सत्ता पाहिजे ना तर देऊन टाकतो.. पण आम्ही जे काम करतो ती करुन दाखवा.. सत्ता आणखी कशाला हवी असते.. लोकांच्या चांगल्या कामासाठीच.
-
सध्या चांगली संधी आहे. अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडतं आहे. त्यामुळे त्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
-
युवा शक्ती फार मोठी शक्ती आहे. युवा शक्तीला नीट घडवलं नाही तर सगळी घडी विस्कटून जाईल.
-
युवा शक्ती आपल्याकडे आहेच. पण त्यांचा हाताला काम दिला नाही तर तो एक बॉम्ब ठरु शकतो. तो तुमच्या बुडाखाली लागला आहे हे विसरु नका
-
तुम्ही चिमूटभर गांजा हुंगताय, पण माझ्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी 150 कोटीचा ड्रग्स पकडलाय
-
जणू काही संपूर्ण जगात माझ्या महाराष्ट्रात गांजा, चरस याचा व्यापार चाललाय असं चित्र निर्माण झालं आहे.
-
मी हिंदू आहे.. मी विधानसभेत बोललोय.. त्याचा मला अभिमान आहे. दुसऱ्या कोणाचा द्वेष करायचा नाही ही आमची शिकवण आहे.
-
घटनेने केंद्राएवढेच राज्यांना अधिकार दिले असतील तर रोजच्या कारभारात केंद्राची लुडबूड नको हे सर्वच राज्यांनी ठरवलं पाहिजे.
-
केंद्राने राज्याच्या कारभारात ढवळाढवळ केली तर ते घटनाबाह्य होईल. असं बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं.
‘गर्व से कहो हम हिंदू है’ : शिवसेना भवनाबाहेर ‘मनसे’चं पोस्टर
-
बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच सांगितलं होतं की, केंद्राएवढंच राज्य सरकार देखील सार्वभौम आहेत.
-
केंद्राचे अधिकार किती, राज्याचे अधिकार किती यावर उघड चर्चा झाली पाहिजे.
-
75 वर्ष झाली आज स्वातंत्र्याला काय केलंत तुम्ही? फक्त भारतमाता की जय, वंदे मातरम घोषणा देऊन काय होणार?
-
26/11 हल्ल्यावेळी जे आमचे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलिसांना माफिया बोलणं शोभतं का तुम्हाला..? आमचे नांगरे-पाटील भेटले मला बाहेर.. असे अनेक पोलीस अधिकारी आहेत जे स्वत:च्या जीवावर उदार होऊन महाराष्ट्राचं रक्षण करतोय.
-
महाराष्ट्रात काही झालं की, लगेच गळा काढायचा.. लोकशाहीचा खून झाला.. मग उत्तरप्रदेशमध्ये काय लोकशाहीचा मळा फुललाय का?
-
मी त्यांना नम्र विनंती केली की, विधानसभेचंच कशाला लोकसभेचं अधिवेशन घेऊयात. देशातील सर्व नेते त्यावर चर्चा करतील.
-
राज्यपालांनी आम्हाला सांगितलं की, दोन दिवसांचं विशेष अधिवशेन घ्या.
-
रक्तदान केल्यानंतर आम्ही म्हणत नाही की, हे रक्त हिंदूला जाणार आहे की मुस्लिमांना
-
रक्तदान शिबीर घेऊन एकनाथ शिंदे आणि ठाणेकरांनी मोठा विक्रम केला आहे.
-
हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आले म्हणजे शुद्ध झाले? म्हणजे भाजपमध्ये गेले तर गंगा.. दुसऱ्या पक्षात गेले की गटारगंगा?
-
दोन्ही पोटनिवडणुका झाल्या त्यात यांना उपरे लागलात आणि म्हणे जगातील मोठा पक्ष
-
कोणाच्याही बायको-मुलांवर आरोप करणं हे हिंदुत्व नाही. याला अक्करमाशापणा म्हणतात.
-
देव-देश आणि धर्माची पालखी वाहणारे आम्ही भोई आहोत.
-
शिवसैनिक तुमची पालखी वाहत नाही म्हणून भष्ट्राचारी झाला?
-
सावरकर उच्चारण्याची लायकी तरी आहे का? गांधीजी उच्चारण्याची लायकी तरी आहे का?
-
सत्ता काबीज करण्याची भाजपला नशा लागली आहे. मोहन भागवत यांना हे पटतंय का?
-
अनेक प्रयत्न केले फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले. माझं आजही आव्हान आहे. पाडून दाखवा.
-
शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. पण प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा आणि आपण भारतीय आहोत ही शिकवण आमच्यावर झाली आहे.
-
आरएसएसचा मेळावा झाला आणि आज आपला आहे. मोहनजी मी आता जे बोलणार आहे ती कृपा करुन टीका समजू नका
-
शिवसेनेला दिलेलं वचन पाळालं असतं तर तुम्ही आज पुन्हा मुख्यमंत्री झालं असता
-
विश्वासघात केला नसता तर आज कदाचित भाजपचा मुख्यमंत्री असता.
-
सत्ता येते-जाते.. पण सत्ता डोक्यात जाता कामा नये
-
मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे असं वाटू नये, मी तुमच्या घरातील आहे असा वाटावं.
-
काही जणांना वाटत होतं मी पुन्हा येईन.. पण आता तिकडेच बसा
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु
-
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं षण्मुखानंद हॉलमध्ये आगमन
ADVERTISEMENT