एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून तेच शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. हा सगळा वाद आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील उद्या (८ ऑगस्ट) होणारी सुनावणी काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपसोबत युती करत शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली. राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अचानक झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या पीठासमोर या शिवसेना वादासंबंधित सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
“घाईने मधुचंद्र आटोपला! लग्नच करायचे विसरले..” शिंदे-फडणवीस सरकारवर शिवसेनेची टीका
आतापर्यंत तीन वेळा सुनावणी झाली असून, सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ८ ऑगस्ट निश्चित केली होती. मात्र, ८ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता धुसर दिसत आहे. कारण ८ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा १७ क्रमांकाच्या पीठा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही न्यायमूर्ती या पीठासमोरील याचिकांची सुनावणी घेणार आहेत.
दुसरीकडे १७ क्रमांकाच्या पीठात समावेश असला तरी न्यायमूर्ती मुरारी आणि न्यायमूर्ती कोहली यांना सरन्यायाधीशांच्या पीठासमोरील शिंदे विरुद्ध ठाकरे याचिकांवर सुनावणीसाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. मात्र, सोमवारसाठी तयार झालेल्या कार्यसूचीमध्ये सरन्यायाधीशांच्या पीठासमोरील अंतिम कार्यसूचील आलेली नाही.
उद्धव ठाकरेंचा ‘गट’; आम्हीच खरी शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या पीठासमोर ८ ऑगस्ट रोजी ३४ प्रकरणांवर सुनावणी निश्चित झाली आहे. त्यामुळे ८ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं खंठपीठ बसणार नाही, अशीच शक्यता दिसत आहे. खंठपीठाची व्यवस्था आणि कार्यसूचीमध्ये अखेरच्या वेळी बदल होऊ शकतो, मात्र, ही शक्यता खूपच कमी दिसत आहे.
ठाकरे गट उल्लेख करत एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेवर दावा
राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेबरोबरच शिंदे गटाने किती ग्रामपंचायतीत विजय मिळवला याचीही चर्चा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांचे आभार मानणारी पोस्ट केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा ठाकरे गट असा उल्लेख केला आहे. तर शिंदे गटाचा उल्लेख शिवसेना असा करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदेंकडून शिवसेनेवर दावा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंच यातून दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT