भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या आमदाराने रस्त्यावर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलेनं या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे ही घटना घडली. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे.
महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, “आमच्या गावात भाजपच्या शाखेचं उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्यानंतर आम्ही वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका वर्षश्रद्धाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी भाजपच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याचा राग मनात धरून आमदार रमेश बोरणारे यांच्यासह कुटुंबातील ९ सदस्यांनी मला मारहाण केली. रस्त्यावर खाली पाडून लाथांनी मला मारलं,” असा आरोप महिलेनं केला आहे.
बॉयफ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडचे न्यूड फोटो इंस्टाग्रामवर शेअर, आरोपी शोधल्यानंतर चक्रावले पोलीस
“यावेळी माझ्यासोबत माझ्या पतीला सुद्धा मारहाण करण्यात आली”, असं पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. आमदार बोरणारे यांच्यासह त्यांचे भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केल्याचं महिलेचा आरोप आहे.
दरम्यान, या घटनेनंतर महिलेनं वैजापूर येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आमदार रमेश बोरणारे यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल आला असून, आता पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT