Shiv Sena MLA: ‘म्हणून शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं’, शिवसेना आमदाराची राणेंवर बोचरी टीका

मुंबई तक

• 02:51 AM • 21 Aug 2021

सिंधुदुर्ग: ‘बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी येऊन सुध्दा नारायण राणेंनी (Narayan Rane) टीका करण्याचे काम केले शिवसैनिकांनाते आवडले नाही. म्हणूनच त्यांनी गोमूत्र शिंपडले.’ अशा प्रतिक्रिया सिंधुदुर्गातील शिवसेना (Shiv Sena) आमदार वैभव नाईक (Vaibha Naik) यांनी दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावरुन राणे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी […]

Mumbaitak
follow google news

सिंधुदुर्ग: ‘बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी येऊन सुध्दा नारायण राणेंनी (Narayan Rane) टीका करण्याचे काम केले शिवसैनिकांनाते आवडले नाही. म्हणूनच त्यांनी गोमूत्र शिंपडले.’ अशा प्रतिक्रिया सिंधुदुर्गातील शिवसेना (Shiv Sena) आमदार वैभव नाईक (Vaibha Naik) यांनी दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावरुन राणे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नेमकी काय टीका केली?

‘बाळासाहेबांच्या पुढे अनेकांच्या माना झुकल्या’

‘खरं तर बाळासाहेबांच्या पुढे अनेक लोकांच्या माना झुकल्या. अनेक लोक नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, प्रणव मुखर्जी असतील किंवा त्या वेळेची ग्यानी झेलसिंग असतील. देवेंद्र फडणवीस यांचा बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी मोठा हातभार आहे हे आम्ही नाकारत नाही. मात्र स्मारकाच्या ठिकाणी येऊन सुध्दा नारायण राणेंनी टीका करण्याचे काम केले. शिवसैनिकांना ते आवडले नाही. म्हणून त्यांनी गोमूत्र शिंपडले.’ असं नाईक यावेळी म्हणाले.

…तेव्हा राणे कुठे होते?’

‘बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी देशातील लाखो जनता त्याठिकाणी आली. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले. परंतु नारायण राणेंना त्या वेळी तिथे येण्याची हिंमत झाली नाही. आज मात्र केंद्रीय मंत्री पदाच्या पदराआड किंवा भाजपच्या पदराआड दर्शन घेतले. पण दर्शन घेताना सुध्दा त्यांना बाळासाहेबांचे विचार कधी समजले नाहीत. अशा लोकांना घेऊन भाजप वाढत असेल तर ते त्यांना लखलाभ. मात्र शिवसेना आजही ठामपणे उभी आहे आणि उद्याही राहील.’ असा टोला आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना लावला आहे.

‘भाजपला आता तालिबानी वाटणाऱ्या शिवसेनेने 1991 साली मुंबई वाचवली होती’

‘1991 साली मुंबईत शिवसेना नसती तर आज जे शिवसेनेला तालिबानी म्हणत आहेत. त्याच शिवसेनेने मुंबई वाचवली होती. हिंदूंना वाचवलं होतं. आजही मुंबईच्या जनतेला माहिती आहे की, शिवसेना नसेल तर मुंबईत हिंदूंचे, मराठी माणसांचे काही खरं नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला तालिबानी संस्कृती म्हटले तरी जनता ही शिवसेनेच्या पाठीशी राहील.’

‘पूरग्रस्तांना राणेंनी काय मदत केली?’

‘नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा शिवसेनेवर टीका करण्यासाठीच आहे. महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात पूर आला, लोकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी राणे आले आणि मला पंतप्रधानांनी पाठवलं म्हणून सांगितले आणि पूरग्रस्तांना मदत करू म्हणाले. मात्र विमानतळावर उतरल्यापासून राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याचे काम केलं होतं.’ असं म्हणत आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला.

‘यावेळी राणे मदत करू म्हणाले होते, मात्र गेल्या दीड महिन्यात राणेंनी पूरग्रस्ताना दमडीसुद्धा दिली नाही. कोकणात एखादा नवीन प्रकल्प किंवा एखादी नवीन योजना आणण्याची घोषणा तरी केली का? फक्त शिवसेनेनेवर टीका करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का? असा सवाल आ. वैभव नाईक यांनी करत या यात्रेला लोकांचा आशिर्वाद मिळणार नसून लोकांचा आशिर्वाद राणेंनी दहा वर्षांपूर्वीच गमावला आहे.’ असंही नाईक यावेळी म्हणाले.

‘राणेंची भाजपच्या पदराआडून शिवसेनेवर टीका’

‘येथील आमदार आणि खासदार शिवसेनेचेच निवडून आले आहेत. त्यामुळे कोकणातील जनतेचा आशिर्वाद राणेंना मिळाला नाही आणि या पुढच्या काळात सुद्धा तो मिळणार नाही. राणे भाजपच्या पदराआड राहून मोदीजींचं नाव सांगून शिवसेनेवर आरोप करण्यासाठी फिरत आहेत.’ अशी टीकाही त्यांनी राणेंवर केली आहे.

फडणवीसांना शह देण्यासाठी केंद्राने Narayan Rane यांच्यासारखं बुजगावणं पुढे आणलं – विनायक राऊतांची टीका

‘भाजपच्या काही लोकांना अजूनही वाटतं सेना-भाजपने एकत्र यावं’

‘भाजपच्या काही लोकांना अजूनही शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे असे वाटते म्हणून भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करीत नाहीत. मात्र अशा बाडग्यांना शिवसेनेवर आरोप करण्यासाठी ही जनआर्शिवाद यात्रा आहे.’ असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

दरम्यान, आता शिवसेना आमदाराच्या या वक्तव्यानंतर नारायण राणे किंवा भाजप नेमकं काय उत्तर देणार?

    follow whatsapp