श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे गेले त्यावेळी त्यांनी आपण शिंदे गटात का गेलो? त्याचं कारण सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच विमानतळावर जोरदार स्वागत झालं. बारणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने पुणे विमानतळावर जमले होते. दिल्लीहून पुण्यात पोहोचतात श्रीरंग बारणे यांनी त्यांची शिंदे गटात जाण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली.
श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत काय म्हटलंय?
महाविकास आघाडीने पार्थ पवारांसाठी मावळ हा मतदारसंघ सोडावा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. तेव्हा शिवसेना पक्षाच्या एकाही नेत्याने उघडपणे विरोध केला नाही. विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने भविष्यातही आम्ही हा मतदारसंघ कुणाला सोडणार नाही ही भूमिका घेतली नव्हती. ही मोठी खंत आहे. खरं तर भविष्याचा विचार केला असता तर इथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायाचा असेल तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही.
उद्धव ठाकरे यांनीच मला सांगितलं हवा तो निर्णय घ्या त्यामुळेच मी शिंदे गटात-श्रीरंग बारणे
२०१४ तसंच २०१९ मधल्या लोकसभा निकालांवरून स्पष्ट झालं आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करावी हे मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यांच्या कानावर ही वारंवार घातली होती. मात्र आता शक्य नाही असं सांगितलं त्यांनी मला तुम्हाला वाटेल तो निर्णय घ्या असं सांगितलं त्यानंतर मी एकनाथ शिंदे गटात गेलो असं श्रीरंग बारणे यांनी सांगितलं.
.
एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले खासदार श्रीरंग बारणे यांचे पिंपरी चिंचवडमध्ये स्वागत करण्यात आलं. समर्थकांनी बंगल्याजवळ गर्दी करत, श्रीरंग बारणे यांना पाठिंबा दर्शवला. खासदारांच्या तुलनेत उपस्थितांची संख्या नक्कीच कमी होती. कारण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या स्वागतकडे पाठ फिरवली. गुरुवारी शहर शिवसेनेनं श्रीरंग बारणे यांविरोधात आंदोलन केलं आणि शेरेबाजी ही केली होती. उद्धव ठाकरेंचे समर्थक आक्रमक असल्याने बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यानंतर राजकीय भूकंप आला. महाविकास आघाडी सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. आता एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. असं घडू नये, पक्ष आणखी फुटू नये म्हणून आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा काढली आहे. या यात्रेत ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही जात आहेत. मात्र रोज एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना एकामागोमाग एक धक्के दिले जात आहेत. शिवसेनेची प्रतिनिधी सभाही आता एकनाथ शिंदे ताब्यात घेऊन शिवसेनेला पडलेलं खिंडार आणखी वाढवायच्या तयारीत आहेत
ADVERTISEMENT