शिंदे विरुद्ध शिवसेना : सर्वोच्च न्यायालयातील निकालाला 2 वर्षे लागणार?; शरद पवार काय बोलले?

मुंबई तक

• 01:13 PM • 15 Sep 2022

शिंदे गट आणि शिवसेने वादासह राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. घटनापीठासमोरील सुनावणी प्रलंबित असून, हा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलंय. त्याचबरोबर राज्यात मंत्रिपदाची शपथ घेऊन काही मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही. त्यावरही शरद पवारांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं. सत्ता स्थापनेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार […]

Mumbaitak
follow google news

शिंदे गट आणि शिवसेने वादासह राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. घटनापीठासमोरील सुनावणी प्रलंबित असून, हा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलंय. त्याचबरोबर राज्यात मंत्रिपदाची शपथ घेऊन काही मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही. त्यावरही शरद पवारांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं.

हे वाचलं का?

सत्ता स्थापनेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार केला. मात्र, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या काही मंत्र्यांनी पदभारच घेतलेला नसल्याची माहिती समोर आलीये. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

मंत्रिपदाची शपथ पण खात्याचा पदभारच घेतला नाही, शरद पवार काय म्हणाले?

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही मंत्र्यांनी अद्याप खात्याची सुत्रं स्वीकारली नसल्याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. शरद पवारांनी उलट प्रश्न केला की, ‘हे खरंय का? अमूक एका मंत्र्याने मंत्रीपदाची शपथ घेतलीये, पण खात्याचा पदभार घेतला नाही. असं एखाद दुसरा असेल, पण अधिक जण आहेत का? किती लोक आहेत अशी?’ असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.

फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू हे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं-शरद पवार

त्यावर पत्रकारांनी शरद पवारांना माहिती दिली की, पाचपेक्षा अधिक मंत्री आहेत, ज्यांनी खात्याचा पदभार घेतलेला नाही. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘हे नवीन आहे.सहसा मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या दिवशीच खात्याचा पदभार घ्यायचा अशी सवय आहे.’

शरद पवार यांच्या या उत्तरानंतर माध्यमांशी सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट खटल्याचा संदर्भ दिला. न्यायालयाच्या निकालामुळे धाकधूक आहे, असंही काही आहे.

मोदींच्या नेतृत्वामुळे प्रकल्प गुजरातला?; शिंंदेंना खडेबोल सुनावत शरद पवारांनी दिलं उत्तर

त्यावर शरद पवार म्हणाले, ‘काय न्यायालयाचा निकाल? समजा निकाल उलटा आला, तर जावं लागेल. न्यायालयाचा निकाल सुद्धा… आधी सांगितलं होतं २१ तारखेला लागेल. नंतर सांगितलं २३ तारखेला. नंतर सांगितलं २७. आता लोकांची खात्री झालीये की, वर्ष-दोन वर्षे निघणार’, असं भाष्य शरद पवार यांनी केलं.

शिंदे गटाचे भरत गोगावले काय म्हणाले होते?

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शिंदे गटाच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना भरत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयातील आणि निवडणूक आयोगातील सुनावणीबद्दल विधान केलं होतं. “तुम्हाला आज सांगतो की, आपलं प्रकरण घटनापीठाकडे गेलेलं आहे. चार ते पाच वर्ष हे ठरणार नाही. तोपर्यंत आपण दुसरी निवडणूक २०२४ ला आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ”, असं भरत गोगावले म्हणाले होते.

    follow whatsapp