मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शुभेच्छा दिल्यामुळे आणि पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Ahalrao Patil) यांची शिवसेनेच्या उपनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु त्या बातम्या खोट्या असल्याते स्पष्टीकरण शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या (Shivsena) मध्यवर्ती कार्यालयाकडून एक पत्रक काढण्यात आले आहे. सामना दैनिकात अनधनाने शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षातून काढल्याची बातमी छापून आली आहे परंतु आढळराव पाटील उपनेते पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलेले आहे.
दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ट्विटरवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ अशा आशयाचे कॅप्शन दिले होते. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील नव्हता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये छापून आली होती.
दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात मागच्या अनेक दिवसांपासून वाकयुद्ध सुरु आहे. आढळराव पाटलांनी अनेक पक्षश्रेष्ठींकडे याची तक्रार देखील होती. राष्ट्रवादी मतदार संघामध्ये शिवसेनेचे काम करत असे आढळराव पाटील अनेकदा जाहीर कार्यक्रमात म्हणाले आहेत. शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने प्रतिस्पर्धी होते. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र आले होते.
ADVERTISEMENT